News Flash

जेटली काहीही न करता ढिम्म बसलेत; चलनसंकटावरून स्वामींचा हल्लाबोल

नोटाबंदीमुळे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा थांबेल, असेही स्वामी म्हणाले.

रजनीकांत यांच्या राजकारण प्रवेशावर सुब्रमण्यम स्वामी यांनी आक्षेप घेतला आहे

भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते आणि राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शनिवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर सर्वसामान्यांना होत असलेल्या त्रासावर कोणत्याही उपाययोजना अथवा पूर्वतयारी केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम आणि अर्थ सचिव शक्तिकांता दास यांच्यावरही टीका केली. ते दोघेही नोटाबंदीनंतर सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्याऐवजी हातावर हात ठेवून बसले आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वीही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी पुन्हा नोटाबंदीनंतर कोणतीही तयारी केली नसल्याचा आरोप करत अरुण जेटली, अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांता दास यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. अर्थमंत्री जेटली यांनी कोणतीही तयारी केली नाही. सर्व काही अस्थिर आहे. मी अरविंद सुब्रमण्यम आणि शक्तिकांता दास यांना हटवण्याबाबत आवाज उठवला होता. पण त्यानंतर अरुण जेटली यांनी त्यांचे समर्थन केले. पण आता मला माहिती झाले आहे की, त्यांनी कोणतेही काम केले नाही. याची कुणीतरी जबाबदारी घ्यायला हवी, असेही स्वामी यानी म्हटले आहे. दरम्यान, स्वामी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेणाऱ्या मोदी सरकारची स्तुती केली आहे. या निर्णयामुळे दहशतवाद्यांना होणारा वित्तपुरवठा थांबेल, असे त्यांनी म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:49 pm

Web Title: arun jaitley arvind subramanian and shaktikanta das sitting idle to tackle currency crunch subramanian swamy
Next Stories
1 पाकिस्तानकडे १३० ते १४० अण्वस्त्रे; अण्वस्त्रांच्या माऱ्यासाठी एफ १६ विमानांमध्ये बदल
2 जेएनयूतील ‘त्या’ बेपत्ता विद्यार्थ्याचा ठावठिकाणा लागला!; महिलेचा दावा
3 इंदिरा गांधींची महती सांगायला मला नवा जन्म घ्यावा लागेल- सोनिया गांधी