22 January 2018

News Flash

सेवा अधिक महाग!

विम्याच्या हप्त्यासाठी वाढीव शुल्क

पीटीआय, श्रीनगर | Updated: May 20, 2017 2:40 AM

वस्तू व सेवा कर ( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

मोबाइल बिल, विम्याच्या हप्त्यासाठी वाढीव शुल्क; खान-पान, मनोरंजन महाग; रस्ते, विमान प्रवास स्वस्त; सेवाक्षेत्राचेही चार करटप्पे; शिक्षण,आरोग्य वगळले

येत्या १ जुलैपासून देशभरात लागू होणार असलेल्या वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) नवे कर दर शुक्रवारी निश्चित   करण्यात आले. शिक्षण व आरोग्य क्षेत्राला करकक्षेतून वगळण्यात आले असून दूरसंचार, विमा, हॉटेल व रेस्टॉरंट्स या सेवा क्षेत्रांसाठी नवे कर दर निश्चित  करण्यात आले. तर इकॉनॉमी श्रेणीतील हवाई प्रवासासह वाहतूक सेवेवर पाच टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला.

वस्तू व सेवा कर परिषदेची येथे सुरू असलेली दोन दिवसीय बैठक शुक्रवारी समाप्त झाली. या बैठकीत दूरसंचार, विमा, हॉटेल व रेस्टॉरंट्स या सेवा क्षेत्रांसाठी अनुक्रमे पाच, १२, १८ आणि २८ टक्के करदर लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोने, चांदी तसेच इतर मौल्यवान धातूंवरील करांबाबत मात्र या बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. वस्तू व सेवा कर परिषदेची ३ जून रोजी पुन्हा बैठक होणार असून त्यात यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

नवे करदर पुढीलप्रमाणे..

 • दूरसंचार व वित्तीय सेवा : १८ %
 • वाहतूक सेवा : पाच टक्के (यात ओला व उबर या सेवांचाही समावेश)
 • वातानुकूलित रेल्वे प्रवास : पाच टक्के
 • इकॉनॉमी श्रेणीतील हवाई प्रवास : ५ %
 • बिझनेस श्रेणीतील हवाई प्रवास : १२ %
 • वातानुकूलित नसलेले रेस्टॉरंट्स : १२ %
 • मद्यविक्री परवाने असलेले वातानुकूलित रेस्टॉरंट्स : १८ %
 • पंचतारांकित हॉटेल : २८ %
 • चित्रपटगृहांतील करमणूक कर : २८%
 • फ्लिपकार्ट आणि स्नॅपडील कंपन्यांना त्यांच्या पुरवठादारांना पैसे अदा करताना एक टक्का टीसीएस वजा करावा लागणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थावर अधिक अधिभार

वस्तू व सेवा कर परिषदेच्या झालेल्या बैठकीत वाहने तसेच तंबाखूजन्य उत्पादनांवरील वाढीव अधिभार स्पष्ट झाले. या वस्तू सर्वाधिक २८ टक्के गटात अंतर्भूत करतानाच त्यावर तब्बल तीन अंकी वाढीव अधिभारही लावण्यात आला आहे.

वस्तू व सेवा कर येत्या १ जुलैपासून देशभर लागू होईल. त्यासाठी आम्ही सज्ज आहोत. या कररचनेमुळे महागाई वाढणार नाही.   अरुण जेटली, केंद्रीय अर्थमंत्री

First Published on May 20, 2017 2:40 am

Web Title: arun jaitley comment on gst rate for services
 1. No Comments.