News Flash

घराणेशाहीच्या राजकारणावर चर्चा घडवून आणणार

विशिष्ट कुटुंबात जन्मलेल्या नेत्यानेच देशाचे नेतृत्व केले पाहिजे का, या बाबत चर्चा घडवून आणण्याचे सूतोवाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी

| June 2, 2013 12:23 pm

विशिष्ट कुटुंबात जन्मलेल्या नेत्यानेच देशाचे नेतृत्व केले पाहिजे का, या बाबत चर्चा घडवून आणण्याचे सूतोवाच राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांनी शनिवारी येथे केले. काँग्रेस घराणेशाही लादत असल्याचा आरोपही त्यांनी केला.काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख न करता जेटली म्हणाले की, राहुल गांधी यांच्याकडे सूत्रे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. भारतात घराणेशाहीची लोकशाही आहे का, असा सवालही जेटली यांनी केला. या प्रश्नावर भाजप चर्चा घडवून आणणार असल्याचेही ते म्हणाले.
विशिष्ट कुटुंबात जन्मला म्हणून त्या नेत्याने नेतृत्व करावे, की ज्याच्यात क्षमता आहे  त्याने नेतृत्व करावे, ही चर्चा होण्याची गरज आहे. वाजपेयी, अडवाणी, मोदी, चौहान, डॉ.रमणसिंग हे त्यांच्या कार्यामुळे नेते बनले, असेही ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 12:23 pm

Web Title: arun jaitley targets congress over dynastic politics
टॅग : Arun Jaitley
Next Stories
1 भारत व नेपाळच्या गृहसचिवांची विशेष बैठक
2 नक्षली हल्ल्यात एसआरपीएफ अधिकारी ठार
3 डेव्हीड हेडलीला ‘तात्पुरते’ ताब्यात द्या; भारताची अमेरिकेकडे मागणी
Just Now!
X