News Flash

राजीनामा देण्याचा निर्णय चुकीचा – केजरीवाल यांना उपरती

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी उपरती झालेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्लीकरांची माफी मागितली.

| May 21, 2014 10:45 am

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय चुकीचा होता, अशी उपरती झालेल्या आम आदमी पक्षाच्या अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी दिल्लीकरांची माफी मागितली. त्याचबरोबर पुन्हा सरकार स्थापन करण्याची शक्यता मावळली असल्याचे सांगत आपला पक्ष पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
केजरीवाल यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, आमचे सरकार असताना विजेचा दर कमी केला होता. त्याचबरोबर पाणीही मोफत देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आम्ही राजीनामा दिल्यानंतर दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. दिल्लीच्या नायब राज्यपालांनी विजेचा दर पुन्हा एकदा पूर्ववत करून मोफत पाणी देण्याचा आमचा निर्णयही रद्द केला. यानंतर अनेक व्यापाऱय़ांना दमदाटी करून त्यांच्या दुकानांवर विक्रीकर विभागाच्या अधिकाऱयांनी छापे टाकले. मी राजीनामा दिल्यामुळेच दिल्लीकरांना या सगळ्याचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे जनता आपल्यावर नाराज असल्याचे केजरीवाल म्हणाले.
दिल्लीमध्ये पुन्हा सत्ता स्थापन करण्यासाठी जनमत घेण्याचा आम्ही विचार करीत होतो. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये परिस्थिती खूप बदलली आहे. त्यामुळे या स्थितीत पुन्हा सत्ता स्थापन करणे सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे आम्ही निवडणुकीची तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील काही दिवसांमध्ये आम्ही दिल्लीतील वेगवेगळ्या भागात सभा घेणार आहेत, असे केजरीवाल म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 10:45 am

Web Title: arvind kejriwal accepted his mistake
टॅग : Arvind Kejriwal
Next Stories
1 पक्षासाठी सध्या संघर्षाची वेळ आणि त्यासाठी आम्ही सज्ज- राहुल गांधी
2 धोरणांना बळकटी आणण्याच्या दृष्टीला सलाम- ओबामांचे मनमोहन सिंग यांना स्तुती पत्र
3 अयोध्येत राम मंदिर उभारा आणि दाऊदला पकडा- वाघेलांचे मोदींना चिमटे
Just Now!
X