News Flash

‘कपिल सिब्बल मला माफ करा’ अरविंद केजरीवालांचा आणखी एक माफीनामा

गडकरी आणि मजिठिया यांचीही मागितली माफी

फोटो सौजन्य-एएनआय

विक्रम मजिठिया आणि नितीन गडकरींपाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कपिल सिब्बल यांचीही माफी मागितली. या सगळ्यांनी आपल्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेण्यासाठी ही माफी मागण्यात आली. कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितली आहे. तसेच नितीन गडकरी यांचीही त्यांनी माफी मागितली आहे. हे दोघे केजरीवाल यांच्याविरोधाताला अब्रू नुकसानाचा दावा परत घेण्याची शक्यता आहे.

माझ्याकडून काहीही पुराव्यांशिवाय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे तुमची बदनामी झाली हे मी जाणतो. त्याचमुळे तुम्ही माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकलात. मी केलेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो आहे. मी त्यासाठी तुमची माफी मागतो. माझी विनंती आहे की माझ्या विरोधातला अब्रू नुकसानीचा खटला आपण मागे घ्यावा. अशी विनंती केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.

एवढेच नाही तर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केजरीवाल यांनी केले होते. त्यांचीही नंतर केजरीवाल यांनी माफी मागितली. मजिठिया यांची माफी मागितल्यावर केजरीवाल यांच्यावर प्रचंड टीका झाली होती. मात्र अब्रू नुकसानीच्या दाव्यापासून वाचण्यासाठी केजरीवाल यांनी सुरू केलेले माफीनाम्याचे सत्र सुरुच आहे असे दिसून येते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 19, 2018 4:49 pm

Web Title: arvind kejriwal apologises to kapil sibal
Next Stories
1 चिनी हॅकर्स करतायत तुमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये घुसखोरी, भारतीय लष्कराकडून अलर्ट
2 व्लादिमीर पुतिन यांच्याबद्दलच्या या गोष्टी तुम्हाला ठाऊक आहेत का?
3 VIDEO – धक्कादायक! बॅटरीच्या प्रकाशात महिलेवर शस्त्रक्रिया
Just Now!
X