News Flash

पंतप्रधानांचे नाव बदलले तरच भाजपाला मते मिळतील – केजरीवाल

या प्रस्तावावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

(संग्रहित छायाचित्र)

अनेक सभांचे साक्ष असलेल्या रामलीला मैदानाचे नाव अटलबिहारी वाजये करण्यात येण्याचा प्रस्ताव दिल्लीतील भाजपाच्या पाच नगरसेवकांनी प्रस्ताव महासभेत सादर केला आहे. या प्रस्तावावरुन आता राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. रामलीला मैदानाचे नाव बदलून मते मिळणार नाहीत. भाजपाला पंतप्रधानांचे नाव बदलावे लागेल अशी बोचरी टीका केजरीवाल यांनी ट्विट करत केली आहे.

 ‘रामलीला मैदानाचे नाव बदलून अटलजींचं नाव दिल्याने मतं मिळणार नाहीत. भाजपला पंतप्रधानांचं नाव बदलावं लागेल. तेव्हा मतं मिळतील. कारण त्यांच्या नावे तर लोक आत मतं देत नाहीत ‘ असे ट्विट केजरीवाल यांनी केले आहे. आप पक्षाने भाजपाला लक्ष केल्यानंर मनोज तिवारी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आप खोटा प्रचार करत असून, भगवान राम आम्हा सर्वांसाठी आराध्य आहेत. त्यामुळे रामलीला मैदानाचं नाव बदलण्याचा प्रश्नच नाही असे मनोज तिवारी म्हणाले आहेत.

रामलीला मैदान इत्यादि के नाम बदलकर अटल जी के नाम पर रखने से वोट नहीं मिलेंगे

भाजपा को प्रधान मंत्री जी का नाम बदल देना चाहिए। तब शायद कुछ वोट मिल जायें। क्योंकि अब उनके अपने नाम पर तो लोग वोट नहीं दे रहे। https://t.co/156uKuTQ7V

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 25, 2018

दिल्लीतील ऐतिहासिक आंदोलनांचे साक्षीदार असलेले मैदान म्हणजे रामलीला मैदान. ब्रिटिशांच्या काळात रामलीला मैदान हा एक मोठा तलाव होता. मात्र, यानंतर तलावात भर टाकून मैदान तयार करण्यात आले. या मैदानात दरवर्षी रामलीलेचे आयोजन केले जायचे. त्यामुळे मैदानाला रामलीला मैदान असे नाव पडले. आता या ऐतिहासिक मैदानाला अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा प्रस्ताव उत्तर दिल्ली महानगर पालिकेने तयार केला आहे. महापौर आदेश गुप्ता म्हणाले, अटल बिहारी वाजपेयींनी या मैदानात अनेक सभा घेतल्या आहेत. त्यामुळे या मैदानाला त्यांचे नाव देण्याचा निर्णय आम्ही घेतला. ३० ऑगस्ट रोजी महासभा होणार असून या महासभेत नामकरणाचा प्रस्ताव मांडला जाईल.

देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी देखील १९५६- ५७ मध्ये याच मैदानात ऐतिहासिक सभा घेतल्या होत्या. जयप्रकाश नारायण यांनी देखील याच मैदानातून तत्कालीन काँग्रेस सरकारविरोधात रणशिंग फुंकले होते. १९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली होती. त्याच दिवशी रामलीला मैदानात जयप्रकाश नारायण आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी देखील रॅली घेतली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2018 5:21 pm

Web Title: arvind kejriwal attack on pm modi bjp
Next Stories
1 पालघरमध्ये ऑनलाईन अंत्यसंस्कार, कुरियरने गुजरातला मागवल्या अस्थी
2 Onam 2018 : ओणम म्हणजे काय ?
3 मतदारयादीत सनी लिओनी, हत्ती आणि कबूतर, सरकारी दरबारी भोंगळ कारभार
Just Now!
X