13 July 2020

News Flash

मोदी सरकारचा जाहिरातींवरील खर्च एक हजार कोटी रुपये

अरविंद केजरीवाल यांचा आरोप

| May 27, 2016 01:53 am

अरविंद केजरीवाल यांचा आरोप
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून करण्यात आलेल्या जाहिरातबाजीवर एक हजार कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सूत्रांचा हवाला देत केला.
मोदी सरकारने केवळ एका कार्यक्रमासाठी जाहिरातींवर एक हजार कोटी रुपये खर्च केले, असे केजरीवाल यांनी सूत्रांचा हवाला देत ट्वीट केले आहे. त्याच वेळी दिल्लीतील आप सरकारने वर्षपूर्तीच्या निमित्ताने केवळ १५० कोटी रुपयेच खर्च केल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
दिल्ली सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्व खात्यांनी मिळून केलेला खर्च १५० कोटी रुपयांहून कमी असल्याचा दावा केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे केला. आप सरकारने जाहिरातींवर वारेमाप खर्च केल्याचा आरोप भाजप आणि काँग्रेसने केला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2016 1:53 am

Web Title: arvind kejriwal comment on modi government
Next Stories
1 संसदेत मंत्र्यांनी दिलेल्या निम्म्याच आश्वासनांची पूर्तता
2 ‘ऑगस्टा वेस्टलॅण्ड’बाबत तपशील उघड करा!
3 चीनला राष्ट्रसंघातील कायम सदस्यत्वासाठी भारताने पाठिंबा दिला होता
Just Now!
X