15 August 2020

News Flash

सरकारच्या कामात ढवळाढवळ नको!

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार विरोध करूनही वरिष्ठ नोकरशहा धरम पाल हेच दिल्लीचे गृहसचिव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

| June 12, 2015 02:45 am

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी जोरदार विरोध करूनही वरिष्ठ नोकरशहा धरम पाल हेच दिल्लीचे गृहसचिव राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी गृहमंत्रालयाच्या निर्देशांनुसार अशा आशयाचे स्पष्ट आदेश जारी केले आहेत.
उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्याचा अधिकार आपल्या सरकारचा आहे. त्यामध्ये ढवळाढवळ करू नये, अशा आशयाचे खरमरीत पत्र अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्रालयाला पाठविल्याने आप आणि केंद्र सरकारमधील संघर्ष विकोपाला जाणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
ज्येष्ठ सनदी अधिकारी धरम पाल यांना मंगळवारी गृहसचिव पदावरून हटवून आप सरकारने पुन्हा त्यांना केंद्रात पाठविले आणि सेवा विभागाचे प्रधान सचिव राजेंद्रकुमार यांच्याकडे त्या पदाचा कार्यभार सोपविला. तथापि, नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पाल यांची बदली फेटाळली आणि त्यांना गृहसचिव पदावर काम करण्याचे आदेश दिले, तर केजरीवाल यांनी राजेंद्रकुमार यांना गृहसचिव म्हणून काम पाहण्यास सांगितले.
त्यामुळे बुधवारपासून धरम पाल आणि राजेंद्रकुमार हे दोन्ही अधिकारी गृहसचिव म्हणून स्वतंत्रपणे काम करीत असल्याचा अभूतपूर्व प्रकार पाहावयास मिळत होता. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी पाल यांची बदली रद्द केली असली तरी केजरीवाल यांच्या सूचनांमुळे गृहमंत्रालयाशी संबंधित फायली कुमार यांच्यामार्फत पाठवल्या जात होत्या.
गुरुवारी सकाळी केजरीवाल यांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठविले. त्यामध्ये म्हटले आहे की, घटनेतील तरतुदींनुसार ज्येष्ठ अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त अथवा तात्पुरता कार्यभार सोपविण्याचे अधिकार दिल्ली सरकारला आहेत. त्याचप्रमाणे बदल्या आणि नियुक्त्या याबाबत म्हणणे मांडण्याचा दिल्ली सरकारला अधिकार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2015 2:45 am

Web Title: arvind kejriwal flexes muscle in letter to union home ministry
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 सोमनाथ भारती यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने
2 मानसिक संतुलन राखण्यासाठी नमाज पढा
3 ‘योगाला विरोध करणारे देशद्रोही’
Just Now!
X