12 August 2020

News Flash

‘केजरीवाल यांना नाटक करण्यातच स्वारस्य’

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे.

| May 24, 2015 06:02 am

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारवर हल्ला चढविल्याने केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्याविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. केजरीवाल यांना केवळ ‘नाटक’ करण्यातच स्वारस्य आहे, तर एनडीएचा उत्तम कारभारावर विश्वास आहे, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकार मागील दरवाजाने दिल्लीचे प्रशासन चालविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केजरीवाल यांनी शुक्रवारी केली होती. त्याबाबत रिजिजू म्हणाले की, केजरीवाल यांना उत्तर देण्याची गरज नाही, ते नाटकच करीत असतात, आमचा उत्तम कारभारावर विश्वास आहे. यामुळे केजरीवाल यांच्या नाटकाला कोणीही भुलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2015 6:02 am

Web Title: arvind kejriwal only wants drama kiren rijiju
Next Stories
1 आसाममध्ये रुळांवरून रेल्वे घसरून चार जखमी
2 झुडपात पडलेल्या बॉम्बच्या स्फोटात पाच मुले जखमी
3 पाकिस्तानकडून इसिसला अण्वस्त्रांची विक्री ?
Just Now!
X