आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना बुधवारी दिल्लीतील न्यायालयाने २३ मे पर्यंत न्यायालयानी कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्यात केजरीवाल यांना न्यायालयाने जामीन देताना न्यायालयाने १० हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलका भरण्यास सांगितले होते. मात्र, ही रक्कम देण्यास नकार दिल्यामुळे केजरीवाल यांना न्यायालयाने तातडीने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पतियाळा हाऊस न्यायालयाने केजरीवाल यांना ही शिक्षा सुनावली.