१५ व्या लोकसभेच सूप शुक्रवारी वाजल़े  त्यामुळे संसदीय शह-काटशहाच्या राजकारणाला तूर्त विराम मिळाला आह़े  आता लढत आहे ती थेट मैदानातच! लोकसभा निवडणुकांचे हे मैदान आता दोन महिन्यांच्या अंतरावर येऊन ठेपले आह़े  प्रचाराचा धुरळा उसळायला आधीच सुरुवात झाली आह़े  आता त्याला अधिक रंगत येणार आह़े  शर्यतीत धावणारे कोण आणि नुसत्या टाळ्या पिटणारे कोण, याच्या निवडीचा हा टप्पा आह़े  पक्ष कोणताही असो निवडणुकांचा रंग तर प्रत्येकाला चढू लागला आह़े
दिल्ली विधानसभेत सुरुवातीला धक्कादायक निकालांनी आपल्या पक्षाची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या आम आदमी पक्षाची लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची मोहीम रविवारपासून सुरू होत आहे. येथील रोहतकमध्ये पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल एका मेळाव्यास संबोधित करणार आहेत. या मेळाव्यात आपचे ज्येष्ठ नेते योगेंद्र यादव व मनीष सिसोदिया हेही मार्गदर्शन करतील, अशी माहिती हरयाणातील आप प्रवक्ते राजीव गोदारा यांनी दिली.
रोहतक हा हरयाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांचा मतदारसंघ आहे, तर योगेंद्र यादव यांचे मूळ गांवही हरयाणातील आहे. त्यामुळे नुकताच आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिलेले केजरीवाल आणि यादव प्रचाराचा नारळ फोडतील. भ्रष्टाचारास विरोध, महागाई, घोटाळे, राजकारणातील घराणेशाही अशा मुद्यांभोवती आम आदमी पक्षाची व्यूहरचना असेल, असे संकेत पक्ष प्रवक्त्यांनी दिले.
दरम्यान, हिस्सार येथे डाव्या पक्षांतर्फे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ रविवारीच ‘विकल्प’ (पर्याय) मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.