केजरीवाल यांचा दावा

केंद्र सरकारने वीज कायदा २००३ मध्ये ज्या सुधारणा प्रस्तावित केल्या आहेत त्या धोकादायक असून गरीब जनता आणि देशातील शेतकऱ्यांचे नुकसान करून काही ऊर्जा कंपन्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा त्यामागे उद्देश आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

या प्रस्तावित सुधारणांमुळे क्रॉस-सबसिडी संपुष्टात येईल, विजेच्या दरात दोन ते पाच पट वाढ होईल आणि मध्यमवर्ग आणि शेतकरी व गरीब यांना वीज परवडणार नाही, असा आरोप केजरीवाल यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

प्रस्तावित सुधारणा धोकादायक असल्याने आपण सर्व मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहोत आणि बिगर भाजप राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची वैयक्तिक भेट घेणार आहोत, असेही ते म्हणाले.