08 August 2020

News Flash

पोलिसांना ‘ठुल्ला’ संबोधल्याने केजरीवाल अडचणीत

दिल्ली पोलिसांचा अवमानकारक उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडणीत सापडण्याची शक्यता आहे.

| July 20, 2015 06:04 am

दिल्ली पोलिसांचा अवमानकारक उल्लेख केल्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल अडणीत सापडण्याची शक्यता आहे. टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान केजरीवाल यांनी दिल्ली पोलिसांना ‘ठुल्ला’ संबोधल्याचा आरोप करीत गोविंदपुरी पोलीस ठाण्यातील कर्मचारी हरविंदर सिंग यांनी केजरीवालांविरोधात तक्रार दाखल केली आहे, तर दिल्लीचे पोलीस उपायुक्त मधूर वर्मा यांनी ट्विटरवरून केजरीवालांवर निशाणा साधला आहे. कथित ठुल्ला संबोधल्या जाणाऱयांपैकी एकाने आज चार वर्षांच्या मुलीचे प्राण वाचवले आणि तिला सुरक्षित तिच्या आईकडे सोपवले, असे उपरोधिक ट्विट करीत वर्मा यांनी केजरीवालांना लक्ष्य केले आहे.

जर एखाद्या ठुल्ला पोलीस कर्मचाऱयाने रस्त्यावरील विक्रेत्यांकडून पैशांची मागणी केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल, असे वक्तव्य केजरीवाल यांनी केल्याचा दावा हरविंदर यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 20, 2015 6:04 am

Web Title: arvind kejriwal thulla remark gets strong retort from delhi top cop
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 पुणे विभागात १० लाख नव्या करदात्यांचे उद्दिष्ट
2 वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्यास भाजपचा नकार
3 राम मंदिर बांधण्याचे आश्वासन भाजपने पूर्ण करावे – विहिंप
Just Now!
X