06 July 2020

News Flash

गडकरी मानहानीप्रकरणी केजरीवालांवर आरोप निश्चित; दोन वर्षांपर्यंत शिक्षेची शक्यता

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मानहानीप्रकरणी आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर आज(शुक्रवार) आरोप निश्चित करण्यात आले.

| June 6, 2014 12:23 pm

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मानहानीप्रकरणी आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर आज(शुक्रवार) आरोप निश्चित करण्यात आले.
केजरीवाल यांच्यावर कलम ४९९ आणि ५०० अंतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. या आरोपांनुसार केजरीवाल यांना दोन वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे.
न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान केजरीवाल यांनी गडकरी यांच्यावर केलेले आरोप मागे घेण्यास नकार दिला. गडकरींबद्दल जे काही बोललो ते खरे बोललो असल्याची भूमिका केजरीवाल यांची होती. गडकरीही मानहानीच्या दाव्यावर ठाम होते आणि केजरीवाल यांच्यावर आरोप निश्चित करण्यात आले.
गडकरीही खटला मागे न घेण्यावर ठाम असल्याने आता केजरीवाल यांच्यासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
याआधी केजरीवाल यांनी याप्रकरणी जातमुचलका भरण्यास नकार दिल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली होती. यावर ‘आप’जनांनी तिहार कारागृहाबाहेर निदर्शनेही केली होती. त्यानंतर उच्च न्यायालयानेही पटियाला न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यानंतर केजरीवाल यांनी जातमुचलका भरण्यास तयारी दर्शविली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2014 12:23 pm

Web Title: arvind kejriwal to appear before court in nitin gadkari defamation case
टॅग Arvind Kejriwal
Next Stories
1 संजय निरुपम यांच्या बदनामीप्रकरणी स्मृती इराणींना समन्स
2 मंत्र्याच्या कार्यालयात सेलफोन, पेन नेण्यास बंदी!
3 ‘बलात्कार चुकीचे आणि बरोबरसुद्धा, ही एक सामाजिक समस्या; प्रतिबंध घालणे कठीण’
Just Now!
X