27 February 2021

News Flash

अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीकरांसाठी ‘हमीपत्र’

दिल्लीतील प्रदूषण कमी करणे याबाबत हमी आम आदमी पक्षाने दिली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

दिल्लीकरांनी पुन्हा संधी दिली तर विद्यार्थ्यांसाठी मोफत बस, महिला सुरक्षेसाठी मोहल्ला मार्शल तैनात करण्याचे आश्वासन आम आदमी पक्षाने रविवारी दिले आहे. याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हमीपत्र प्रसिद्ध केले आहे. यात पक्षाने दहा आश्वासने दिली आहेत.

दोनशे युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवठा,  मोफत आरोग्य सुविधा, दोन कोटी झाडे लावणे, यमुना नदी स्वच्छ करणे तसेच दिल्लीतील प्रदूषण कमी करणे याबाबत हमी आम आदमी पक्षाने दिली आहे.

काँग्रेस-राजद आघाडी

नवी दिल्ली : बिहार बाहेर आपले अस्तित्व निर्माण करण्याचा लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाचा प्रयत्न आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.  काँग्रेसशी आघाडी करून ते चार जागा  लढणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 12:50 am

Web Title: arvind kejriwals guarantee letter for delhiites abn 97
Next Stories
1 इंटरनेट बंदीसंदर्भातील विधानावर नीती आयोग सदस्याची माफी
2 राज्यांचा विरोध घटनाबाह्य – सीतारामन
3 हुथी बंडखोरांच्या क्षेपणास्त्र, ड्रोन हल्ल्यात येमेनमध्ये ८० सैनिक ठार
Just Now!
X