रिसर्च अँड अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ) या भारतीय गुप्तचर संस्थेच्या नागरी विमानन व संशोधन केंद्राचे प्रभारी अरविंद सक्सेना यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (यूपीएससी) सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली. ३२ वर्षे जुन्या संशोधन आणि विश्लेषण सेवेतून या आयोगावर नेमले जाणारे ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत. ऑगस्टमध्ये निवृत्त होणार असलेल्या सक्सेना यांची यूपीएससीवर निवड झाल्यामुळे या आयोगावर फक्त एका सदस्याची जागा रिक्त आहे. आयोगाचे अध्यक्षांव्यतिरिक्त १० सदस्य आहेत. सक्सेना यांनी लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांचा कार्यकाळ सुरू होईल, असे नियुक्ती आदेशात म्हटले आहे.