संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. कर्नाटकात त्रिशंकु स्थिती असेल असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात होता. मात्र, अनपेक्षितपणे सर्वच मतदानोत्तर चाचण्या खोट्या ठरवत भाजपा येथे सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला असून बहुमताच्या दिशेने भाजपाची वाटचाल सुरू आहे. दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या पक्षाला खूप मोठा धक्का बसला आहे. कारण काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य जवळपास गेल्यात जमा आहे.

कर्नाटक निवडणूक ही राहुल गांधींसाठी मोठी परीक्षा मानली जात होती. औपचारिकरित्या काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर लढविलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या गुजरातसह अन्य दोन राज्यांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी होत्या, तर निकालापूर्वी ही सूत्रे राहुल यांच्याकडे सोपविण्यात आली होती. पंजाबचा अपवाद वगळता गेल्या चार वर्षांमध्ये काँग्रेसला एकामागून एक राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. तर, कर्नाटक हे काँग्रेसकडे असलेले शेवटचे मोठे राज्य होते.

काँग्रेसकडे आता फक्त पंजाब, मिझोरम आणि पॉंडिचेरी हीच राज्ये आहेत. कर्नाटकचे निकाल स्पष्ट होईपर्यंत येथील विजयासाठी राहुल गांधींनी खूप मेहनत घेतली आहे, राहुल यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावर काँग्रेसला येथे बहुमत मिळेल आणि भाजपाला जनता नाकारेल असं काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांकडून सातत्याने सांगितलं जात होतं. पण आता नेमका हाच मुद्दा हेरुन सोशल मीडियावर भाजपा समर्थकांकडून राहुल यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. राहुल गांधी यांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांच्या मेहनतीमुळेच काँग्रेसने आणखी एक राज्य गमावलं, त्याबद्दल राहुल यांचे आभार अशा प्रकारचे खिल्ली उडवणारे एकाहून एक मजेशीर ट्विट युजर्स करत आहेत.
एक नजर सोशल मीडियावरील मजेशीर ट्विट्सवर –