ओदिशाला धडकलेल्या शक्तीशाली फॅनी चक्रीवादाळामुळे वीज पुरवठयावर परिणाम झाला आहे. अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला आहे. रस्ते ओस पडले आहेत. राज्याची राजधानी भुवनेश्वरसह कटक आणि भद्रक या शहरांमध्ये सोसाटयाच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या २० वर्षातील भारतात धडकलेले हे सर्वात भीषण चक्रीवादळ आहे.

ओदिशाच्या नऊ जिल्ह्यातील १० हजार गावे आणि ५२ शहरांवर या चक्रीवादाळाचा परिणाम होणार आहे. वादळाची भीषणता लक्षात घेऊन १० लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. अनेक भागांमध्ये वृक्ष उन्मळून पडले आहेत.

भुवनेश्वरसह कटक आणि भद्रकमध्ये सर्व दुकाने बंद असून रस्ते ओस पडले आहेत. काही तुरळक खासगी वाहने सोडल्यास रस्त्यावर एकही गाडी दिसत नाहीय. गुरुवार रात्रीपासूनच या भागात पाऊस सुरु आहे.