News Flash

दिल्लीत करोनाची तिसरी लाट?; आरोग्यमंत्री म्हणतात, आता मास्कलाच समजा लस

दिल्लीत गुरुवारी प्रदुषणाची पातळी देखील खूपच वाढल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाने सांगितले.

दिल्ली प्रदुषण (प्रातिनिधीक छायाचित्र)

दिल्लीत करोनाच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. देशात करोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून गुरुवारी दिल्लीत दिवसभरातील सर्वाधिक करोनाचे रुग्ण आढळून आले. सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत ५,००० पेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. करोनावर लस येण्यास अजून काही काळ जाणार असल्याने सध्या तोंडाला मास्क लावणे हीच लस माना, असा सल्ला दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे.

माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन म्हणाले, “मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येण्यामागे मोठ्या प्रमाणावरील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि करोनाच्या चाचण्या कारणीभूत आहेत. राष्ट्रीय राजधानीत एकूण रुग्णालयांतील ३५ टक्के बेड करोनाच्या रुग्णांनी भरले आहेत. नागरिकांनी संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजना कराव्यात तसेच सातत्याने तोंडाला मास्क लावावेत.” दिल्ली सरकारच्या माहितीनुसार, गुरुवारी दिल्लीत ५,७३९ रुग्ण आढळून आले. या दिवशी ६०,१२४ रुग्णांच्या चाचण्या पार पडल्या.

“मोठ्या प्रमाणावरील कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि टेस्टिंगमुळे करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. जोपर्यंत करोनावर लस येत नाही तोवर मास्कलाच नागरिकांनी लस समजावं. जर तुम्ही मास्क लावलंत तर तुमचं प्रदुषण आणि कोविड-१९ या दोन्हींपासून संरक्षण होईल,” असंही जैन यांनी म्हटलं आहे. दिल्लीत गुरुवारी प्रदुषणाची पातळी देखील खूपच वाढल्याचे प्रदुषण नियंत्रण मंडळाने सांगितलं होतं. प्रदुषणवाढीमुळे देखील करोनाच्या संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दिल्लीत करोनाच्या रुग्णांची संख्या ३,७५,७५३ इतकी झाली असून यांपैकी सध्या ३०,९५२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आजवर ६,४२३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जैन यांनी कालचं म्हटलं होतं की, दिल्लीत करोनाच्या तिसऱ्या लाटेसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2020 3:34 pm

Web Title: as delhi records highest single day coronavirus cases health minister says consider mask as vaccine aau 85
टॅग : Coronavirus
Next Stories
1 Bihar Election : ब्रिटनच्या पंतप्रधानांपेक्षाही काही उमेदवारांकडे आहे अधिक संपत्ती
2 अल्पवयीन मुलानं केला वडिलांचा खून; क्राईम पेट्रोलचे १०० व्हिडिओ पाहून पुरावे केले नष्ट
3 मुलीच्या लग्नावर ५०५ कोटी खर्च करणारा भारतीय उद्योगपती झाला दिवाळखोर
Just Now!
X