News Flash

कलम ३७० हे कर्करोगाच्या जखमेप्रमाणे होते, यामुळे काश्मीरमध्ये रक्तपात झाला : संरक्षणमंत्री

पाकिस्तानला १९६५ आणि १९७१ प्रमाणे पुन्हा चुक न करण्याचा दिला इशारा

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कलम ३७० ही कर्करोगासाखी जखम होती असे म्हटले आहे. तसेच यामुळे केवळ आमच्या हृयावरच वार झाले नाहीतर, काश्मीरमध्ये रक्तपात झाला असल्याचेही ते म्हणाले आहेत.

पाटणा येथे एका कार्यक्रमाप्रसंगी संरक्षणमंत्री बोलत होते. यावेळी कलम ३७० बाबत ते म्हणाले की, हे घटनेत कर्करोगाच्या एखाद्या जखमेप्रमाणे होते. यामुळे आमच्या हृदयावर वार झाले आणि पृथ्वीवरील स्वर्ग म्हणजेच आमच्या काश्मीरमध्ये केवळ रक्त सांडले गेले.
प्रत्येकजण स्वप्न पाहत असतो. लोक म्हणतात की ते जी स्वप्न पाहतात, ती सत्यात उतरत नाहीत. मात्र पंतप्रधान मोदींनी हे करून दाखवले. आम्ही देखील स्वप्न पाहतो मात्र डोळे उघडे ठेवून पाहतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. असेही यावेळी राजनाथसिंह यांनी बोलून दाखवले.

यावेळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना उद्देशुन राजनाथसिंह यांनी म्हणाले की, तुम्ही पाहू शकता ते आतपासूच निराश होत आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये येतात आणि म्हणतात की, देशवासी भारत-पाकिस्तान सीमेवर जात नाहीत. मी म्हटलं चांगलंच आहे, कारण जर का त्यांनी तसं केलं तर पुन्हा पाकिस्तानमध्ये जाऊ शकणार नाहीत. त्यांनी १९६५ आणि १९७१ प्रमाणे पुन्हा चुक करू नये. जर पाकिस्तानने पुन्हा अशी चुक केली तर त्यांनी विचार करायला हवा की, पाकिस्तानव्याप्त काश्मीरचे काय होईल.

तसेच,  त्याठिकाणी बलूच आणि पश्तून यांच्याविरोधात मानवधिकारांचे उल्लंघन केले असल्याचे सांगत. जर हे असेच सुरूच राहिले तर कोणतीही शक्ती पाकिस्तानचे आणखी तुकडे होण्यापासून वाचवू शकणार नाही, असा इशाराही संरक्षणमंत्र्यांनी यावेळी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2019 4:42 pm

Web Title: as far as article 370 is concerned it was a nasoor cankerous wound in the constitution msr87
Next Stories
1 कूलर बनवणाऱ्या फॅक्टरीत आग, दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू
2 कलम ३७० जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देत होते हे ऐतिहासिक खोटे : नड्डा
3 जोरदार वादळाचा एअर इंडियाच्या विमानाला फटका, क्रू-मेंबर्स जखमी
Just Now!
X