कोविड -१९ च्या उत्पत्ती विषयी डब्ल्यूएचओ आणि चीन यांनी संयुक्तपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार त्यांनी असे म्हटले आहे की हा विषाणू वटवाघूळांपासून मनुष्यापर्यंत दुसऱ्या प्राण्यामार्फत संक्रमित होण्याची परिस्थिती बहुधा जास्त आहे. प्रयोगशाळेतून या विषाणूचा प्रसार होण्याची संभावना नाही. असोसिएटेड प्रेस यांना मिळालेल्या अहवालाच्या एका प्रतीनुसार ही माहीती मिळाली आहे.

हे निष्कर्ष मोठ्या प्रमाणात अपेक्षेप्रमाणे होते व त्यामुळे बरेच प्रश्न अनुत्तरीत राहिले आहेत. या संघाने विषाणूचे प्रयोगशाळेतून गळतीचे गृहीतक वगळता इतर प्रत्येक क्षेत्रात पुढील संशोधन प्रस्तावित केले आहे.

या अहवालाच्या प्रकाशनास वारंवार विलंब झाला आहे. चीनवरील करोनायरसमुळे महामारी पसरवण्याचा आरोप टाळण्यासाठी चीनी पक्ष अहवालामध्ये काही फेरफार करून वेगळे निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करीत होता की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अधिकाऱ्याने गेल्या आठवड्याच्या शेवटी सांगितले की “पुढील काही दिवसांत” हा अहवाल प्रकाशनासाठी तयार होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

जिनेव्हा येथे असलेल्या डब्ल्यूएचओ सदस्य देशातील एका अधिकाऱ्याकडून सोमवारी असोसिएटेड प्रेसला अहवालाची अंतिम आवृत्ती प्राप्त झाली. हा अहवाल प्रसिद्ध होण्यापूर्वीच अजूनही बदलला जाऊ शकतो का हे समजू शकले नाही. अधिकाऱ्याला त्यांची ओळख पटवायची नव्हती कारण प्रकाशनापूर्वी अहवाल दाखवण्याचा अधिकार त्यांना नव्हता.