News Flash

‘ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तानवर बोलू शकतात, मात्र…’ ओवैसींचे मोदींवर टीकास्त्र!

'करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी'

देशात करोनाचा कहर सुरू आहे. जगातील अनेक देश भारताच्या मदतीसाठी येत आहेत. देशातील करोनाच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन, बेड आणि औषधांची सातत्याने कमतरता येत आहे. दरम्यान, विरोधी पक्ष केंद्र सरकारवर हल्ला करत आहेत आणि आवश्यक वस्तूंची उपलब्धता सुनिश्चित करण्याची मागणी करत आहेत. एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार धरले. करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी ओवैसी यांनी केली आहे.

“पंतप्रधान संसद आणि पत्रकार परीषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तान बद्दल तासनतास बोलू शकतात, परंतु ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी”, असे ओवैसी म्हणाले. 


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३,६६,१६१ नवीन रुग्णांची नोंद झाली असून, त्यानंतर संक्रमित लोकांची संख्या २.२६ दशलक्ष ओलांडली आहे. २४ तासांत ३७०० हून अधिक रूग्णांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.

२४ तासांत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ५३ हजारांवर गेली आहे, ही दिलासाची बाब आहे. आतापर्यंत 1 कोटी 86 लाख 71 हजार 222 लोकांना करोना मुक्त करण्यात आले आहे. देशात सक्रिय रूग्णांची संख्या 37 लाख 45 हजार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 2:35 pm

Web Title: asaduddin owaisi criticizes narendra modi over corona situation srk 94
Next Stories
1 २० दिवसात १८ प्राध्यापकांचा करोनामुळे मृत्यू; अलिगढ मुस्लीम विद्यापीठाच्या कुलगुरूंचं ICMR ला पत्र
2 काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अखेर मुहूर्त मिळाला; कोण होणार अध्यक्ष?
3 दिल्लीतील रुग्णालयात करोनाचा विस्फोट; ८० डॉक्टर, कर्मचारी निघाले पॉझिटिव्ह
Just Now!
X