News Flash

ओवेसींकडून ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा

मुस्लिमांनी या देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे.

ASADUDDIN OWAISI : स्वातंत्र्यलढ्यात अनेक मुस्लिमांनी बलिदान दिले आणि ते फासावरही गेले. आम्ही कधीही ब्रिटिशांकडे दयेची भीक मागितली नसल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

‘भारत माता की जय’ म्हणणार नाही, असे सांगत वादाच्या भोवऱ्यात सापडलेले एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आम्हाला इतर कुणाकडून देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्याची गरज नसल्याचे सांगितले. ते सोमवारी लखनऊ येथील सभेत बोलत होते. तत्पूर्वी झालेल्या पक्ष बैठकीत ओवेसी यांनी ‘हिंदुस्थान जिंदाबाद’ आणि ‘जय हिंद’च्या घोषणा दिल्या. मुस्लिमांनी या देशासाठी खूप मोठे बलिदान दिले आहे. केवळ ‘भारत माता की जय’ ही घोषणा न दिल्यामुळे त्यांच्या देशभक्तीविषयी कोणीही शंका घेऊ शकत नाही. आम्ही या देशासाठी रक्ताचे शिंपण घातल्याचे यावेळी ओवेसींनी सांगितले. त्यामुळे आम्हाला (मुस्लिम) कुणाकडूनही देशभक्तीचे प्रमाणपत्र मिळवण्याची गरज नाही. आमच्या देशभक्तीवर शंका घेणारेच देशद्रोही आहेत. १८५७च्या लढ्यापासून ते स्वातंत्र्य मिळेपर्यंत आमच्यावर शंका घेणाऱ्या लोकांचा कुठेच पत्ता नव्हता. स्वातंत्र्यलढ्यात अनेक मुस्लिमांनी बलिदान दिले आणि ते फासावरही गेले. आम्ही कधीही ब्रिटिशांकडे दयेची भीक मागितली नसल्याचे ओवेसी यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2016 10:40 am

Web Title: asaduddin owaisi raises slogans of hindustan zindabad jai hind at party meet
Next Stories
1 पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे पथक आज पठाणकोटमध्ये; संरक्षणासाठी बुलेटप्रुफ गाड्या
2 जगमोहन, अनुपम खेर, अजय देवगण यांना पद्म पुरस्कार प्रदान
3 मोदींच्या लाहोर भेटीवर पाक लष्कर नाराज
Just Now!
X