मागील काही दिवसांपासून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चर्चेत आहे. मजुरांना घरी सोडण्यावरून महाराष्ट्रातील ठाकरे सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या चांगलच ट्विटरवॉर सुरू झालं होतं. या ट्विट युद्धावरून एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना प्रश्न प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ओवेसी यांच्यावर चिमटे काढत टोले लगावले.

आणखी वाचा- मोदी त्यांचा मूड देशाला नाही तर ट्रम्प यांना सांगतात; असदुद्दीन ओवेसी यांचा सरकारवर हल्लाबोल

खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आजतक वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांना विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्यावरून महाराष्ट्र सरकार आणि रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या ट्विटरवाद झाला, त्याविषयी प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना ओवेसी म्हणाले,”पीयूष गोयल यांची जितकी प्रशंसा करावी तितकी कमीच आहे. ते खुपच चांगले व्यक्ती आहेत. इतके चांगले की त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगून टाकलं, भूकेमुळे कुणाचाही मृत्यू झालेला नाही. इतके ते लायक आहेत. पीयूष गोयल नेमकं कोणत्या दुनियेत आहेत. मागील दहा दिवसात श्रमिक रेल्वेगाड्यांमध्ये ८० लोकांचा मृत्यू झाला. रेल्वेमध्ये पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था नाही करू शकत का?,” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.

आणखी वाचा- भाजपाची सत्ता नसलेल्या राज्यांवर ओवेसी भडकले; हा असंवैधानिक लॉकडाउन का स्वीकारला?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ मे रोजी महाराष्ट्रातील जनतेशी राज्यातील स्थितीविषयी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी सरकारकडून करण्यात असलेल्या कामाबरोबरच स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरही भाष्य केलं होतं. राज्य सरकारकडून अधिक विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी केली जात आहे. मात्र, त्या दिल्या जात नाही. ३०-४० गाड्या दिल्या जातात, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. त्यानंतर रेल्वेमंत्री आणि राज्य सरकारमध्ये ट्विटरवर बरंच घमासान झालं. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी तब्बल १४५ गाड्या सोडण्याची घोषणा केली. त्याचबरोबर एका तासात सरकारनं सर्व माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडे द्यावी, असं म्हटलं होतं.