05 December 2020

News Flash

उत्तराखंडमधील पाणथळ रामसर यादीत

आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

(संग्रहित छायाचित्र)

 

उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे. १९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो. त्यांची परिसंस्थेचा भाग म्हणून जपणूक केली जाते. पाणथळ जागा संवर्धन जाहीरनामा म्हणून रामसर जाहीरनाम्याची ओळख आहे. त्यामुळे जैवविविधतेला पाठबळ मिळून मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होते. रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत. उत्तराखंडमध्ये रामसर दर्जा मिळालेले आसन हे पहिले ठिकाण आहे. येथे माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती असून जैवविविधता भरपूर आहे असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आशियात भारताची एकूण ३८ पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.

जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र २० कोटी हेक्टरचे आहे.भारताच्या १० पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता. इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.

आसन पाणथळ क्षेत्र

उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यत विकासनगर तहसीलपासून १५ कि.मी. अंतरावर आसन पाणथळ क्षेत्र आहे. ४४४.४० हेक्टर क्षेत्रात ते पसरलेले आहे. तेथे ५४ प्रजातीचे पक्षी मध्य आशिया, चीन, रशियातून येतात. ऑक्टोबरमध्ये त्यांचे आगमन होते व मार्चपर्यंत ते वास्तव्य करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:34 am

Web Title: asan wetland in uttarakhand abn 97
Next Stories
1 मुलींच्या लग्नवयाचा निर्णय लवकरच
2 महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीच्या मागणीची याचिका फेटाळली
3 किमान आधारभूत भाव योजना कायम -मोदी
Just Now!
X