अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण केल्याचा आरोप असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांची सोमवारी पौऱुषत्व चाचणी (पोटेन्सी टेस्ट) घेण्यात आली आणि ती ‘पॉझिटिव्ह’ असल्याचे त्याच्या अहवालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे या मुद्द्यावरून शारीरिक शोषणाच्या आरोपांपासून स्वतःला बाजूला करू पाहणारे आसाराम बापू यांच्यापुढील अडचणीत वाढ झालीये. 
‘आसाराम बापूंवर आंधळेपणाने विश्वास ठेवला तेच चुकले’
जोधपूर पोलिसांनी आसाराम बापू यांना शनिवारी रात्री इंदूरमधून अटक केली. न्यायालयाने त्यांना एक दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस कोठडी मिळाल्यानंतर सोमवारी त्यांची जोधपूरमधील एस. एन. वैद्यकीय महाविद्यालयात पौरुषत्व चाचणी करण्यात आली. या चाचणीचा निकाल पॉझिटिव्ह असल्याचे त्याच्या अहवालावरून स्पष्ट झाले. आसाराम बापू यांना जोधपूरपासून ३० किलोमीटरवर असलेल्या मनई आश्रमातही नेण्यात आले होते. याच आश्रमात संबंधित मुलीचे शारीरिक शोषण करण्यात आले होते. घटना घडली त्या दिवशी तिथे नेमके काय झाले, याची फेरपाडताळणीही यावेळी करण्यात आली. त्याआधारे पोलिस आसाराम बापूंविरोधात आणखी काही गुन्हे दाखल करू शकता येतील का, याचा विचार करताहेत.
समर्थकांचा थयथयाट!