07 March 2021

News Flash

आसाराम बापूंच्या नार्को चाचणीची मागणी

लैंगिक शोषणप्रकरणी सध्या अटकेत असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या नार्को चाचणीची मागणी १६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी केली.

| September 11, 2013 03:06 am

लैंगिक शोषणप्रकरणी सध्या अटकेत असलेले स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्या नार्को चाचणीची मागणी १६ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलांनी केली. शाहजहांपूर जिल्ह्यातील राहत्या घरी पत्रकारांना बोलावून पीडित मुलीच्या वडिलांनी संवाद साधला. देशभरातून आसाराम यांना असणाऱ्या आंधळ्या पाठिंब्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. जर आसाराम हे निष्पाप आहेत, तर मग ते पॉलिग्राफी आणि ब्रेनमॅपिंग चाचण्यांना सामोरे जायला का घाबरतात? असा प्रश्न पीडित मुलीच्या वडिलांनी उपस्थित केला. 
“नार्को चाचण्या केल्यावर सत्य काय आहे ते जगासमोर येईल. माझे कुटुंब कोणत्याही चौकशीला सोमोरे जाण्यास तयार आहे.”, असे पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले. पीडित मुलीच्या वडिलांनी तपास सीबीआयकडे देण्याची मागणी केली. सत्य बाहेर येण्यासाठी आसाराम यांना पाठिंबा देणाऱ्यांनादेखील सीबीआय चौकशीची मागणी करायला हवी, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 3:06 am

Web Title: asaram sexual assault case girls father demands narco test on godman
टॅग : Asaram Bapu
Next Stories
1 सभेला या टोप्या आणि बुरखा मिळवा..
2 दिल्ली सामूहिक बलात्कारप्रकरणी चारही आरोपी दोषी
3 जनता कोणत्या नेत्याचे समर्थन करते हे स्पष्ट झालंय – राम माधव
Just Now!
X