News Flash

आसारामची एम्समध्ये वैद्यकीय तपासणी

जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या जामीन अर्जासंबंधात त्यांना गुरुवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीतील

| January 2, 2015 04:06 am

जोधपूर येथील आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषीत आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या जामीन अर्जासंबंधात त्यांना गुरुवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत दिल्लीतील एम्स रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले.  
आसाराम बापू याने प्रकृती अस्वास्थ्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. त्याला आधार म्हणून त्यांनी जोधपूरमधील एका रुग्णालयाचे अहवाल सादर केले होते. त्यात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने तो अर्ज नाकारत नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयातील तज्ज्ञांकडून फेरतपासणी करून घेण्यास सांगितले होते. तसेच त्यासाठी एम्समध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याच्या सूचना एम्सच्या संचालकांना १५ ऑक्टोबर रोजी दिल्या होत्या. यापूर्वी आसाराम यांच्या तपासणीसाठी ३ डिसेंबर ही तारीख मुक्रर करण्यात आली होती. पण आसाराम याने जमिनीवरून प्रवास करण्यास असमर्थता व्यक्त केल्याने ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, आसाराम बापूंना पाहण्यासाठी  अनुयायांनी गर्दी केली होती. त्यापैकी एका महिलेने सांगितले की, आसाराम बापू निर्दोष आहेत. केवळ एका मुलीच्या आरोपामुळे सर्व अनुयायांच्या विश्वासाला तडा जाऊ शकत
नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 4:06 am

Web Title: asaram undergoes medical examination at aiims
टॅग : Asaram
Next Stories
1 रॉबर्ट वढेरांच्या कंपनीला नोटीस
2 सरकार स्थापनेसाठी भाजपची मुदतीची मागणी
3 ‘एअरएशिया’ विमानाच्या ब्लॅक बॉक्सचा शोध सुरूच
Just Now!
X