स्वयंघोषित संत आसाराम बापू यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यामुळे भाविक आता इतर साधूसंतांकडे संशयाने बघू लागल्याची प्रतिक्रिया ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी लुधियानामध्ये दिली. 
ते म्हणाले, चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्येच असतात. औषधनिर्मिती, राजकारण आणि इतरही सर्वच क्षेत्रात चांगले-वाईट घटक असतातच. मात्र, आसाराम बापूंवरील आरोपांमुळे भाविकांच्या मनात आजच्या साधूसंतांबद्दल रागाची भावना निर्माण झालीये. त्यांच्या मनातील साधूसंतांच्या प्रतिमेला धक्का बसलाय. त्यामुळेच ते आता इतर संतांकडेही संशय़ाच्या नजरेने बघू लागले आहेत.
आसाराम बापूंवर करण्यात येणाऱया आरोपांमध्ये सत्य काय आहे, हे आता न्यायालयच ठरवेल. कोणीही पोलीसांपासून पळून जाऊ शकत नाही. पळून जाण्यापेक्षा आत्मसमर्पण करणे आणि सत्यपरिस्थिती बाहेर येण्यासाठी प्रयत्न करणे जास्त महत्त्वाचे असते, असेही रविशंकर म्हणाले.