संयुक्त राष्ट्रांच्या अस्थायी सदस्यत्वासाठी निवडणूक

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात दोन वर्षे मुदतीच्या अस्थायी  सदस्यत्वासाठी भारताच्या उमेदवारीस चीन व पाकिस्तान यांचा समावेश असलेल्या एशिया-पॅसिफिक गटाने पाठिंबा दिला आहे.

पंधरा सदस्यीय सुरक्षा मंडळातील पाच अस्थायी सदस्यपदांसाठी पुढील वर्षी जूनमध्ये निवडणूक होत असून यात निवड झालेल्या अस्थायी सदस्यांना २०२१ व २०२२ अशी दोन वर्षे काम करता येईल.

एशिया-पॅसिफिक गटातील देशांनी भारताच्या उमेदवारीला एकमुखी पाठिंबा दिला आहे. सुरक्षा मंडळाचे अस्थायी सदस्यत्व २०२१ व २०२२ अशा दोन वर्षांसाठी आहे. सर्व ५५ सदस्यांचे त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी भारताच्या वतीने आपण आभार मानतो, असे संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत सय्यद अकबरूद्दीन यांनी सांगितले.

सध्याचे दहा अस्थायी सदस्य

बेल्जियम, कोटव्हॉयर, डॉमनिक प्रजासत्ताक, विषुवृत्तीय गिनी, जर्मनी, इंडोनेशिया,  कुवेत, पेरू, पोलंड, दक्षिण आफ्रिका.