गीरच्या अभयारण्यातील आशियायी सिंहांची संख्या वाढून ती ५२३ झाली आहे. आधी ४११ सिंह होते, आता ते ५२३ झाले आहेत. २०१० च्या तुलनेत ही वाढ २७ टक्के आहे.
यंदाच्या गणनेनुसार १०९ नर व २०१ माद्या आहेत, तर  सिंहाचे छावे २१३ आहेत. २०१० मध्ये ९७ नर, १६२ माद्या तर १५२ छावे होते. गीर अभयारण्याचे अधीक्षक संदीप कुमार यांनी सांगितले की, सिंहांच्या अधिवासाचे क्षेत्र २२ हजार चौरस किलोमीटर झाले आहे. पाच वर्षांत ते दुप्पट वाढले आहे.