News Flash

#AskKTR: प्रश्न जनतेचे उत्तरं मंत्र्याची… लॉकडाउनसंदर्भातील शंकाचं निरसन झालं थेट ट्विटरवरुन

या प्रश्नोत्तरांसाठी रामाराव यांनी दोन तासाचा वेळ दिला होता

#AskKTR: प्रश्न जनतेचे उत्तरं मंत्र्याची… लॉकडाउनसंदर्भातील शंकाचं निरसन झालं थेट ट्विटरवरुन
(संग्रहित छायाचित्र)

तेलंगणाचे मंत्री केटी रामा राव यांनी गुरुवारी संध्याकाळी #AskKTRच्या माध्यमातून ट्विटरवरुन राज्याच्या नागरिकांच्या शंकांचं निरसन केलं. त्याचबरोबर राज्यातल्या १० दिवसांच्या लॉकडाउनच्या निर्बंधांसंदर्भातली जनतेची मतं जाणून घेतली.

रामाराव हे नगरपालिका प्रशासन, नगरविकास, उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री आहेत. तसंच राज्यातल्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राज्य टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. करोनासंदर्भातली औषधं आणि लसींचा योग्य पुरवठा करण्याच्या उद्देशाने या टास्क फोर्सची निर्मिती कऱण्यात आली आहे.

हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी आपल्या शंका विचारल्या आहेत. त्यांना रामाराव यांनी त्वरित उत्तरंही दिली. एका युजरने विचारलं की, आपण राज्यातल्या चाचण्या कमी करुन त्यामुळे कमी होणाऱ्या आकड्यांकडे पाहत आत्मसंतुष्ट तर होत नाही ना? या युजरला दिलेल्या उत्तरात रामाराव म्हणतात, असं बिलकुल नाही. मी माहितीच्या आधारे सांगत आहे. त्याचबरोबर गृहविलगीकरणात असलेल्या आणि उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीच्या आधारे बोलत आहे.

एका नागरिकाने त्यांना विचारलं की गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात फक्त ७० हजार चाचण्या झाल्या, पूर्वी १ लाखाच्या आसपास चाचण्या होत होत्या. त्याचबरोबर राज्य दररोज दीड लाख चाचण्या करुन निष्कर्ष काढण्याआधीच सरकार रुग्णसंख्येचा दावा कसा करु शकते असा सवालही त्याने उपस्थित केला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, आयसीएमआरने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्वांनुसार एखाद्याला लक्षणं दिसू लागल्यावर त्याच्या चाचणीचा निष्कर्ष काहीही येवो, त्याला सरकारद्वारा व्हिटॅमिन आणि प्राथमिक औषधं दिली जाऊ शकतात.

या प्रश्नोत्तरांसाठी रामाराव यांनी दोन तासाचा वेळ दिला होता. राज्यातल्या करोना परिस्थितीविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली. त्याचबरोबर ही परिस्थिती हाताळण्यासाठीच्या राज्याच्या नियोजनाबद्दलच्या शंकांना तात्काळ उत्तरेही दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2021 12:50 pm

Web Title: ask ktr telangana minister question answer session on twitter vsk 98
Next Stories
1 भारत अजून हिंमत हरलेला नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी
2 सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांची प्रसूती करणाऱ्या डॉक्टरचा करोनामुळे मृत्यू
3 देशात गेल्या २४ तासात ३ लाख ४३ हजार १४४ जणांना करोनाची लागण
Just Now!
X