News Flash

मिशेलचे जाबजबाब घेण्याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा

मिशेल याला २२५ कोटींच्या दलाली प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

मिशेलचे जाबजबाब घेण्याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा
(संग्रहित छायाचित्र)

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील दलाल ख्रिस्तीयन मिशेल याचे तिहार तुरुंगात जाबजबाब घेण्याची परवानगी सक्तवसुली संचालनालयाने मागितली असून त्यावर दिल्ली न्यायालयाने तिहार तुरूंग अधिकाऱ्यांकडे प्रतिसाद मागितला आहे.

मिशेल याला २२५ कोटींच्या दलाली प्रकरणी अटक करण्यात आली आहे. तुरूंग अधिकाऱ्यांनी मिशेलचे जाबजबाब तुरूंगात घेण्याबाबत परवानगी देण्याबाबत मंगळवापर्यंत उत्तर द्यावे असे न्यायालयाने म्हटले आहे.

विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांनी मिशेल याला मंगळवारी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. मिशेल याचा तुरूंगात मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार त्याच्या वकिलांनी केली आहे. त्याला गेल्या  वर्षी २२ डिसेंबर रोजी दुबईतून भारतात आणल्यानंतर अटक करण्यात आली होती.

मिशेल याला तिहार तुरूंगातील वेगळ्या खोलीत हलवण्याच्या तुरूंग अधिकाऱ्यांच्या निर्णयावर न्यायालयाने ताशेरे ओढले होते कारण तसे करण्यामागचे कारण तुरूंग अधिकाऱ्यांनी दिले नव्हते.  या प्रकरणात गिडो हाश्के व कालरे गेरोसा हे आणखी दोन दलालही आहेत मिशेलची चौकशी सक्तवसुली संचालनालय व केंद्रीय अन्वेषण विभाग करीत आहे.

मिशेलच्या आधीच्या पत्नीची मालमत्ता जप्त

अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर्स खरेदी प्रकरणात अटक करण्यात आलेला दलाल ख्रिस्तियन मिशेल याच्या आधीच्या पत्नीची पॅरिस येथील ५.८३  कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली असल्याची माहिती  सक्तवसुली संचालनालयाने दिली आहे. मिशेल याला काळा पैसा विविध मार्गाने फिरवल्याच्या आरोपावरून अटक केली असून सक्तवसुली संचालनालनालये सांगितले की, पीएमएलए कायद्यानुसार ४५ अ‍ॅव्हेन्यू व्हिक्टर ह्य़गो ही फ्रान्समधील मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले असून ही मालमत्ता मिशेल याची आधीची पत्नी व्हॅलेरी मिशेल हिच्या मालकीच्या मे. एससीआय सोलेम कंपनीची आहे.  या महिलेला दलालाची रक्कम मिळाली असून त्यातून तिने ही मालमत्ता खरेदी केली होती.  मिशेल याने त्याला मिळालेली दलालीची काही रक्कम तिच्या नावावर वर्ग केली होती. ही रक्कम ५८३४०४२२ रुपये आहे. तिने ही रक्कम एससीआय सोलेम या कंपनीत गुंतवली. त्यातून मालमत्ता विकत घेण्यात आली. मिशेल याला संयुक्त अरब अमिरातीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये भारताच्या ताब्यात दिले  होते नंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. ३६०० कोटी रुपयांच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात मिशेल याच्याशिवाय गिडो हाश्के व कालरेस हे आणखी दोन दलाल आहेत. जून २०१६ मध्ये मिशेल याच्यावर २२५ कोटींची दलाली ऑगस्टा वेस्टलँड कंपनीकडून घेतल्याच्या मुद्दय़ावर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 2:05 am

Web Title: ask the officials to take a look at michelle
Next Stories
1 अधिकाऱ्यांच्या परवानग्या न घेता कन्हैय्याकुमारसह इतरांवर आरोपपत्र
2 धार्मिक आधारावर विभाजनाचा डाव!
3 मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसचे रणशिंग
Just Now!
X