News Flash

यादीत मतदार ९०; प्रत्यक्ष मतदान मात्र १७१!

आसाम निवडणूक

(संग्रहित छायाचित्र)

आसामच्या दिमा हसाओ जिल्ह््यातील एका मतदान केंद्रामध्ये केवळ ९० पात्र मतदारांची नोंद असताना तेथे प्रत्यक्षात १७१ जणांनी मतदान केल्याचे उघड झाल्याचे सोमवारी अधिकाºयांनी सांगितले.

हाफलाँग मतदारसंघात हे मतदान केंद्र असून तेथे १ एप्रिल रोजी मतदान झाले, हाफलाँगमध्ये ७४ टक्के  मतदान झाले. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याने या मतदान केंद्रावरील पाच निवडणूक अधिकाºयांना निलंबित केले आहे. खोतलीर एलपी शाळा १०७(ए) या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्यावे, असे जिल्हा अधिकाऱ्याने प्रस्तावित केले आहे.

तथापि, या ठिकाणी फेरमतदान घेण्याबाबतचे आदेश अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत. या मतदान केंद्रावरील मतदार यादीत ९० जणांची नावे होती, परंतु प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये १७१ जणांनी मतदान केल्याची नोंद झाली, असे अधिकाºयांनी सांगितले. ग्रामप्रमुखाने मतदार यादी योग्य असल्याचे मान्य करण्यास नकार दिला आणि स्वत:च मतदारांची यादी आणली, असे अधिकाऱ्याने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2021 12:16 am

Web Title: assam elections 90 voters in the list 171 direct votes abn 97
टॅग : आसाम
Next Stories
1 ‘नक्षलवाद्यांविरोधातील मोहिमेची आखणीच चुकीची होती’
2 बांगलादेशात प्रवासी बोट बुडून २६ जण मृत्युमुखी
3 आसाममधून करोना केव्हाच गेला!
Just Now!
X