24 November 2020

News Flash

मुलीवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी नराधमाने कोर्टाबाहेरच केली पत्नीची हत्या

आसाममधील नाहरकटीया येथे राहणाऱ्या ३५ वर्षांच्या नराधमावर ११ महिन्यांपूर्वी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

(संग्रहित छायाचित्र)

मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या नराधमाने न्यायालयाच्या बाहेर पत्नीवर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना आसाममध्ये घडली. दिब्रूगडमधील जिल्हा सत्र न्यायालयाच्या बाहेर शुक्रवारी दुपारी ही घटना घडली.

आसाममधील नाहरकटीया येथे राहणाऱ्या ३५ वर्षांच्या नराधमावर ११ महिन्यांपूर्वी स्वत:च्या १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. आरोपी हा नाहरकटीया येथील रहिवासी आहे. आरोपीच्या पत्नीने ग्रामस्थांना त्याने मुलीवर अत्याचार केल्याचे सांगितले होते. यानंतर ग्रामस्थांनी महिलेला घेऊन पोलीस ठाणे गाठले आणि तिच्या पतीविरोधात तक्रार दिली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली होती. ६ जून रोजी तो जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. मात्र, यानंतर तो घरी परतला नव्हता. घरी गेल्यास ग्रामस्थ विरोध करतील, अशी भीती त्याला वाटत होती. तो गेले काही दिब्रुगडमधील एका हॉटेलमध्ये राहत होता.

शुक्रवारी या खटल्याची दिब्रूगडमधील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. आरोपीची पत्नी न्यायालयात साक्ष देणार होती. पत्नी कोर्टाच्या आवारात येताच त्याने तिला गाठले आणि चाकूने तिच्यावर वार केले. यानंतर तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.

न्यायालयाच्या आवारात तैनात असलेल्या पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. पोलीस आरोपीला गाडीत नेत असताना त्याने माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ‘माझ्या पत्नीने मुलीवर बलात्कार केल्याचा खोटा आरोप केला होता. मी माझ्या मुलीसोबत कधीही असे करणार नाही. माझ्या पत्नीचेच अनेक पुरुषांशी अनैतिक संबंध होते. यामुळेच तिने मला खोट्या गुन्ह्यात फसवले. तिला बघून माझा राग अनावर झाला आणि मी तिच्यावर हल्ला केला’, असे त्याने सांगितले.  या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2018 12:19 am

Web Title: assam man accused of raping his daughter killed his wife outside sessions court at dibrugar
Next Stories
1 पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरणात एका संशयिताला अटक
2 गौरी लंकेश, गोविंद पानसरे, कलबुर्गी हत्या प्रकरणात सनातन, हिंदू जनजागृती समितीचा थेट संबंध नाही – एसआयटी
3 परशुराम वाघमारेनेच केली गौरी लंकेश यांची हत्या, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येसाठी एकाच शस्त्राचा वापर
Just Now!
X