News Flash

आसाम: दारू पिण्यास विरोध केल्याने पत्नीला तिहेरी तलाक; तक्रार दाखल करूनही पोलिसांची कारवाई नाही

तिहेरी तलाक दिल्यानंतर पत्नी आणि मुलीला घराबाहेर काढलं

प्रातिनिधीक फोटो

आसाममधील नागाव जिल्ह्यात दारुच्या आहारी गेलेल्या पतीने पत्नीला तिहेरी तलाक दिल्याचा धक्कादायर प्रकार समोर आला आहे. दारु पिण्यास विरोध करत असल्याने त्याने पत्नीला तिहेरी तलाक दिला. या विरोधात महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी पुढे कारवाई न केल्याने महिलेला वडिलांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे.

पीडित मेजिदा खातून यांनी पतीवर दारूच्या नशेत मारहाण केल्याचे आरोप केले आहेत. मेजिदा आणि पती बसीर अहमद या्ंच्यात दारूवरून भांडणं होत असत. मात्र दारूच्या व्यसनात बुडून गेलेल्या बसीरला याबाबत बोलल्याचा राग यायचा. अनेक वेळा तो पत्नीला मारहाण करायचा. बसीर एक दिवस सुधारेल, या आशेपोटी ती दारू सोडवण्यासाठी प्रयत्न करत होती. वेळप्रसंगी मारही खात होती. मात्र बसीरला दारूशिवाय काहीच दिसत नव्हतं. बसीरला राग अनावर झाल्याने त्याने पत्नीला तिहेरी तलाक दिला आणि लहान मुलीसह घराबाहेर हाकलून दिलं. याबाबतचं वृत्त इंडिया टुडे या वेबपोर्टलवर देण्यात आलं आहे.

VIDEO: भरदिवसा ब्रीजवरुन नदीत फेकला करोना रुग्णाचा मृतदेह; धक्कादायक घटना कॅमेऱ्यात कैद

“आम्हाला ६ वर्षांची मुलगी आहे. माझ्या पतीने मला तिहेरी तलाक दिला आहे आणि माझ्या लहान मुलीसह घराबाहेर हाकलून दिलं आहे. आता मी माझ्या वडिलांच्या घरी राहात आहे.”,असं  मजेदा खातून यांनी सांगितलं. “याबाबत मी पोलिसातही तक्रारी दिली आहे. मात्र पोलिसांनी पुढे काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे मी आणि माझ्या मुलीला कोणताच आधार राहिलेला नाही” असंही त्यांनी पुढे सांगितलं. तिहेरी तलाक हा कायद्याने गुन्हा आहे याबाबतचं भानही पती बसीरला नाही.

रक्ताळलेला डोळा… हातावर काळे व्रण; मेहुल चोक्सीचे कोठडीतील फोटो आले समोर

महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी जुलै २०१९ मध्ये तिहेरी तलाक विधेयक पारीत करण्यात आलं आहे. तिहेरी तलाकविरोधातील ‘द मुस्लीम विमेन (प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑन मॅरेज) बिल- २०१७’ मंजूर करण्यात आले. तिहेरी तलाक दिल्यास ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. त्याचबरोबर दंड देखील होऊ शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2021 3:18 pm

Web Title: assam man gives triple talaq to his wife for stopping him from taking liquor rmt 84
Next Stories
1 मोदी सरकारने पूर्ण केले सात वर्ष; अमित शाहांचं ट्विट, म्हणतात…
2 Corona: हरयाणात ७ जूनपर्यंत लॉकडाउन असणार; मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांची माहिती
3 मेहुल चोक्सीला भारतात आणण्याची तयारी सुरु?; भारतीय विमान डोमिनिकात दाखल
Just Now!
X