News Flash

मिझोरामविरोधात आसाम सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार: सरमा

मिझोराम सीमेवर काल झालेल्या चकमकीत आसामचे पाच पोलीस मारले गेले तर एक नागरिक ठार झाला.

मिझोरामविरोधात आसाम सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार: सरमा
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा

सिलचर : आसामच्या मिझोराम सीमेलगतच्या संरक्षित जंगलांचा विनाश व तेथील अतिक्रमण या विरोधात आसाम सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी मंगळवारी सांगितले. मिझोराम सीमेवर काल झालेल्या चकमकीत आसामचे पाच पोलीस मारले गेले तर एक नागरिक ठार झाला. इतर साठ जण त्यात जखमी झाले होते.

सिलचर येथे पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, उपग्रहाने काढलेली छायाचित्रे पाहिली तर आसामच्या हद्दीलगत असलेल्या जंगलांमध्ये रस्ते बांधण्यात आले असून जंगले जाळून नंतर त्या भागात शेती केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. जंगलांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहोत. ईशान्येकडे जंगले जाळून तेथे शेती करण्याची पद्धत रूढ आहे. आताचा वाद हा जमिनीचा नसून राखीव वनांवरील अतिक्रमणाचा आहे. आमच्या वस्त्या त्या भागात नाहीत. तसे असेल तर मिझोरामने त्याचे पुरावे द्यावेत. आम्ही आमच्या वस्त्या काढून घेऊ. आसामच्या इंचभर जमिनीवरचे अतिक्रमण आम्ही खपवून घेणार नाही. लोकांनी सीमा रक्षणासाठी प्राण दिले असून आम्ही त्यासाठी कुठलीही किंमत मोजायला तयार आहोत.  दोन राज्यांत सीमावाद सुरू असून सोमवारी दोन्ही राज्यांचे नागरिक व पोलीस यांच्यात चकमक झाली होती. सीमेवरून सुरक्षा दले मागे घेण्यास केंद्राने या राज्यांना सांगितले आहे. आम्ही सुरक्षा दले माघारी घेतली आहेत पण मिझोरामने तसे केलेले नाही. चौकीपासून आमची सुरक्षा दले शंभर मीटर अंतरावर आहेत. आसाम सरकारने म्हटले आहे की, कछर, करीमगंज, हैलाकांडी येथे सीमावर्ती भागात कमांडो दले तैनात करण्यात येणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2021 2:38 am

Web Title: assam mizoram border dispute assam government decides to move supreme court zws 70
Next Stories
1 ‘क्षी जिनपिंग यांची तिबेट भेट भारतासाठी धोक्याची’
2 संसदेत ‘पेगॅसस कोंडी’ कायम
3 ब्रिटिश भारतीय कादंबरीकार संजीव साहोटा पुन्हा बुकर नामांकनांच्या यादीत
Just Now!
X