News Flash

भांडण सोडवायला गेलेल्या कमांडोची हत्या

काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस दलातील कमांडोची भोसकून हत्या केली.

आसामच्या तीनसुकीया जिल्ह्यातील माकुम भागात सोमवारी काही अज्ञात हल्लेखोरांनी पोलीस दलातील कमांडोची भोसकून हत्या केली. गिरीश दत्ता (३७) असे मृत कमांडोचे नाव आहे. ते आसाम कमांडो बटालियनमध्ये होते. देरगावच्या पोलीस प्रशिक्षण कॉलेजमध्ये तैनात असणारे गिरीश रविवारीच माकुम येथे आले होते.

तीनग्राय येथील कार्यक्रम आटोपून गिरीश आपल्या वडिलांसोबत घरी चालले होते. त्यावेळी एनएच ३८ वर झालेल्या अपघातावरुन काही जणांची वादावादी सुरु होती. गिरीश दत्ता यांनी मध्यस्थी करण्यासाठी हस्तक्षेप केला.

शाब्दीक वादावादी झाल्यानंतर तिथून निघत असताना गर्दीमधील सशस्त्र हल्लेखोरांनी त्यांची भोसकून हत्या केली. सोमवारी नागरिकांनी हल्लेखोरांना शिक्षा होण्यासाठी एनएच-३८ महामार्ग रोखून धरला. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 12:31 pm

Web Title: assam police commando stabbed to death
Next Stories
1 केरळमध्ये ‘हाय अलर्ट’, निपाह व्हायरस बाधित रुग्ण आढळला
2 ओला उबेरच्या व्यवसाय वाढीला ब्रेक ; भाड्यातही वाढ
3 सपा बरोबर कायमची युती तोडलेली नाही, पण पोटनिवडणूक स्वबळावर लढणार – मायावती
Just Now!
X