News Flash

शाळकरी मुलीसोबत अश्लील फोटो काढणारा शिक्षक गजाआड!

उत्साह या एनजीओनं या शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती

अखेर विकृत शिक्षकाला अटक

फईझउद्दीन अन्सारी या विकृत शिक्षकाला अखेर आसाम पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येते आहे. आसामच्या हैलाकांडी जिल्ह्यातील काटलीचेरा या गावात असलेल्या मॉडेल शाळेत फईझउद्दीन हा विकृत शिक्षक काम करत होता. त्यानं विद्यार्थिनीसोबत काढलेला अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड केला, जो चांगलाच व्हायरल झाला.

ज्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनीही पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या शिक्षकाविरोधात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर उत्साह (युनिव्हर्सल टीम फॉर सोशल अॅक्शन अँड हेल्प) या एनजीओनंही या शिक्षकाविरोधात आवाज उठवत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आता आसाम पोलिसांनी फईझउद्दीन अन्सारी या विकृताला अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

फईझउद्दीन अन्सारी या शिक्षकानं तीन ते चार दिवसांपूर्वी एका विद्यार्थिनीसोबत अश्लील आणि आक्षेपार्ह फोटो काढले. ते सोशल मीडियावर अपलोड केले. एवढंच नाही तर फईझउद्दीनविरोधात छेडछाड केल्याच्या तक्रारी याआधीही नोंदवण्यात आल्या आहेत. तरीही तो त्याचे अश्लील चाळे आणि वर्तन सोडत नाहीये असंच दिसून आलं होतं.

फईझउद्दीन अन्सारीनं एका महिलेसोबत गैरवर्तन केल्यानं लोकांनी त्याला रस्त्यात मारहाणही केली होती. हैलाकांडी पोलीस या शिक्षकाला अटक का करत नाहीत? असाही प्रश्न गावकऱ्य़ांनी उपस्थित केला होता. तसंच या शिक्षकाविरोधात चांगलाच जनक्षोभही उसळला होता. या सगळ्यानंतर आता पोलिसांनी फईझउद्दीन या विकृत शिक्षकाला अटक केली आहे. या शिक्षकावर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता होते आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 7, 2017 5:08 pm

Web Title: assam teacher arrested for posting obscene photographs with student
Next Stories
1 ‘मुलावरील छेडछाडीच्या आरोपांवरुन सुभाष बरालांनी राजीनामा द्यावा’
2 भाजप नेत्याने रुग्णवाहिका अडवल्याने रुग्णाचा मृत्यू; नातेवाईकांचा गंभीर आरोप
3 देशभरातल्या ३९ गोशाळा बंद होणार! २० हजार गायींची सुरक्षा वाऱ्यावर?
Just Now!
X