News Flash

VIDEO: याला म्हणतात कर्तव्यनिष्ठा… मुसळधार पावसातही तो हवलदार ‘ऑन ड्युटी’ होता

'आमच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्वाचे आहे'

व्हायरल फोटो

सोशल मिडियावर आपल्या कलागुणांमुळे किंवा एखाद्या कृतीमुळे एखादी व्यक्ती रातोरात स्टार होतात. सध्या ट्विटवर असाच एक आसामच्या वाहतूक शाखेचा पोलीस हवलदार स्टार झाला आहे. भर पावसामध्ये चौकात उभं राहून वाहतूक नियंत्रण करणाऱ्या या पोलीस हवलदाराला त्याच्या कर्तव्यनिष्ठतेसाठी अनेक जण ट्विटवरुन सलाम करत आहेत.

आसामची राजधानी असणाऱ्या दिसपूरमधील सर्वात वर्दळीचा चौक म्हणून लोकप्रिय असणाऱ्या बस्तीस्था चौकातील एका व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. वादळी वाऱ्यांसह पाऊस पडत असताना एका गाडीतून काढलेल्या या व्हिडीओमध्ये चौकाच्या मध्यभागी असणाऱ्या छोट्या चौथऱ्यावर उभा राहून एक पोलीस हवलदार गाड्यांना दिशा दाखवण्याचे काम करताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार मिथून दास असे या हवलदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे जोरात पाऊस पडत असताना आणि चौथऱ्यावर छप्पर नसतानाही रेनकोटशिवाय मिथून पावासात उभं राहून आपलं काम करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वृत्तसंस्थेशी बोलताना मिथून म्हणतात, ‘सकाळी सात ते दुपारी बारा या वेळात माझी शिफ्ट असते. मी शिफ्ट संपण्याच्या पाच मिनिटे आधी जोरदार पाऊस पडू लागला. मात्र बारानंतर माझ्या जागी ज्या हवलदाराने यायला हवे होते त्याला उशीर झाला. त्यामुळे मी जवळ जवळ वीस मिनिटांसाठी पावसात उभं राहून वाहनचालकांना मदत करत होतो.’

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मिथून जोरात पाऊस पडत असताना, वाऱ्यात आणि विजांच्या कडकडाटात उभे असलेले दिसत आहेत. ‘खरं तर जोरदार पाऊस, वारा आणि विजांच्या कडकडाटामुळे तिथं उभं राहणं थोडं भितीदायक होतं. पण आमच्यासाठी कर्तव्य सर्वात महत्वाचे असतं म्हणूनच मी तेथे उभं राहण्याचा निर्णय घेतला,’ असं मिथून सांगतात. मिथून यांच्या कर्तव्यनिष्ठतेचे त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतूक केले आहे. ‘मिथून हे शहरातील सर्वात व्यस्त चौकात आपली ड्युटी करत होते. पाऊस पडल्याने वाहतुककोंडी होण्याची शक्यता अधिक असते. म्हणूनच मिथून यांनी तेथेच उभं राहून वाहतूक नियंत्रणाचे काम सुरु ठेवले. यावरुन पोलिसांसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले कर्तव्य सर्वात महत्वाचे असते हेच दिसून येते,’ असे मत गुवहाटीचे वाहतूक पोलीस आयुक्त दिपक कुमार यांनी व्यक्त केले. ‘मिथून यांच्या कृत्याचा पोलीस खात्याला अभिमान असून लवकरच त्यांना यासाठी सत्कार केला जाईल’, अशी माहितीही कुमार यांनी दिली.

मिथून हे कार्बी अॅनलाँग जिल्ह्यातील असून ते २०१५ पासून पोलीस खात्यात कार्यरत आहेत. सध्या फेसबुक, ट्विटर आणि व्हॉट्सअपवर मिथून यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे दिसत आहे. आसाम पोलिसांच्या ट्विटर हॅण्डलवरुनही मिथून यांची स्तृती करण्यात आली आहे. आसाम पोलीस आपल्या ट्विटमध्ये लिहितात, ‘याला म्हणतात समर्पण. आम्ही हवलदार मिथून दास यांना सलाम करतो. आपल्या कर्तव्यनिष्ठतेने आपण एखाद्या वादळाचेही शिंतोड्यामध्ये रुपांतर करु शकतो.’

दरम्यान रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आसाममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 11:25 am

Web Title: assam traffic cop stands on duty during storm becomes social media star
Next Stories
1 स्पेशल सेलचे मोठे यश! जैशच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक
2 बोलणारा देव मीच आहे; सोलापूरमधील भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचा अजब दावा
3 केजरीवालांची राहुल गांधींबरोबर भेट निष्फळ, आघाडीला नकार
Just Now!
X