News Flash

आसाममधील परिस्थितीचा लष्करप्रमुखांकडून आढावा

बोडो फुटीरतावाद्यांकडून ७० आदिवासींची हत्या करण्यात आलेल्या भागात तैनात केलेल्या सैन्याची लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी शनिवारी पाहणी केली.

| December 28, 2014 05:16 am

बोडो फुटीरतावाद्यांकडून ७० आदिवासींची हत्या करण्यात आलेल्या भागात तैनात केलेल्या सैन्याची लष्करप्रमुख दलबीरसिंग सुहाग यांनी शनिवारी पाहणी केली. याच वेळी या भागात अतिरिक्त फौजा तैनात करण्यात येतील का, याची माहितीही त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. 

राज्यातील सुरक्षा स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी घेण्यात आलेले उपाय आणि कारवाईची माहिती त्यांनी शनिवारी सकाळी अधिकाऱ्यांकडून घेतल्याची माहिती संरक्षण प्रवक्त्याने दिली.
राज्यात समाजविरोधी कारवायांमध्ये गुंतलेल्यांविरुद्ध कारवाई अधिक कडक करण्याचे आदेश सुहाग यांनी फिल्ड कमांडरना दिले. कारवायांसाठी अतिरिक्त फौज लागल्यास ती पुरवण्याची हमी त्यांनी दिली. या वेळी त्यांनी अनेक अधिकाऱ्यांशी चर्चा केली. परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी राज्य प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य पुरवण्यात जवानांनी कोणतीही कसूर ठेवू नये, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.
समाजात दहशत पसरवणाऱ्यांविरुद्ध निष्ठूर कारवाई करा, असा आदेशही त्यांनी या वेळी दिला. राज्यातील फुटीरतावादी संघटनांवर दबाव आणण्यासाठी विविध सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून सावधगिरीचे उपाय हाती घेण्याचे सुहाग यांनी आदेशात म्हटले आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी फिल्ड कमांडर यांनी हाती घेतलेल्या विविध उपायांबाबतही सुहाग यांनी समाधान व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2014 5:16 am

Web Title: assam violence army chief dalbir singh suhag to hold close door strategy meeting with officials
टॅग : Army Chief
Next Stories
1 शेतकऱ्यांना कर्जमाफी कितपत व्यावहारिक?
2 जेटली कुटुंबीयांकडून नौदल हेलिकॉप्टरचा वापर?
3 पाकिस्तान लष्कराच्या कारवाईत ६० दहशतवादी ठार
Just Now!
X