News Flash

इराणचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह यांची दहशतवाद्यांनी केली हत्या

इराणचे परराष्ट्र मंत्री जरीफ मोहम्मद यांनी हत्येची केली निंदा

इराणचे टॉपचे अणुशास्त्रज्ञ मोहसीन फखरीजादेह (Mohsen Fakhrizadeh) यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इराणमध्ये या बातमीमुळे खळबळ माजली आहे. तेहरानजवळ मोहसीन फखरीजादेह यांची दहशतवाद्यांनी हत्या केली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ मोहम्मद यांनी या हत्येची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली आहे. इराणमध्ये अणुबॉम्बची निर्मिती करण्यात फखरीजादेह यांचा मोठा वाटा होता.

मोहसीन फखरीजादेह यांच्या हत्येमुळे इराण आणि इस्रायल यांच्यातला तणाव वाढला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले आहे. पाश्चात्य देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा असा विश्वास आहे की इराणच्या गुप्त अण्वस्त्र शस्त्रांच्या मोहिमेबाबत कायमच मोहसीन फखरीजादेह होते. परराष्ट्र मुत्सदी मोहसीन फखरीजादेह यांना इराणी अणुबॉम्बचे जनकही मानतात. आपला आण्विक कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी असल्याचं इराणने कायमच सांगितलं आहे. २०१० ते २०१२ या दोन वर्षांच्या कालावधीत इराणच्या चार अणुशास्त्रज्ञांची हत्या झाली. यासाठी इराणने इस्रायलला दोषी ठरवलं आहे.

फखरीजादेह २००३ पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्बची निर्मिती मोहिमेचं नेतृत्त्व करत होते. मात्र इराणने कायमच आण्विक हत्यारे बनवण्याच्या आरोपाचे खंडन केलं आहे. इराण लष्कराचे कमांडार हिसैन देहघन यांनी ट्विट करत फखरीजादेह यांच्या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल असा इशारा दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 3:26 pm

Web Title: assassination iranian nuclear scientist mohsen fakhrizadeh by terrorists scj 81
Next Stories
1 पंतप्रधान मोदींनी झायडसच्या टीमची पाठ थोपटली, टि्वट करुन म्हणाले…
2 उत्तर प्रदेशात ‘लव्ह जिहाद’ विरोधातील कायदा लागू; अध्यादेशाला राज्यपालांनी दिली मंजुरी
3 “ते कोणतं साडे आठ कोटींचं विमान मागत आहेत?”
Just Now!
X