19 September 2020

News Flash

भाजपाला लक्ष्मीदर्शन! वार्षिक उत्पन्न १०३४ कोटी रुपये

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सात राष्ट्रीय पक्षांचा अहवाल मंगळवारी जाहीर केला.

राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

देशातील विविध राज्यांमध्ये सत्ता काबीज करत असतानाच भाजपाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ झाली आहे. भाजपाचे एक वर्षात उत्पन्न तब्बल ८१ टक्क्यांनी वाढले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या उत्पन्नात १४ टक्क्यांची घट झाली आहे.

असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने सात राष्ट्रीय पक्षांचा अहवाल मंगळवारी जाहीर केला. भाजपा, काँग्रेस, बहुजन समाज पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीआय- एम, कम्यूनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, तृणमूल काँग्रेस या पक्षांचा यात समावेश आहे. या वर्षभरात या पक्षांचे उत्पन्न १, ५५७ कोटी रुपये होते. तर खर्च १,२२८ कोटी रुपये इतके होते. (यात उत्पन्न म्हणजे राजकीय पक्षांना मिळणारा निधी आणि देणग्यांचा समावेश आहे.)

निवडणूक आयोगाला पक्षांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भाजपाचे २०१६- १७ मधील उत्पन्न तब्बल ८१. १८ टक्क्यांनी वाढले आहे. २०१५- १६ च्या तुलनेत २०१६- १७ मध्ये भाजपाचे उत्पन्न ४६३.४१ कोटी रुपयांची वाढले. २०१५- १६ मध्ये भाजपाचे उत्पन्न ५७०. ८६ कोटी रुपये इतके होते. तर हेच प्रमाण २०१६- १७ मध्ये थेट १०३४. २७ कोटी रुपयांवर पोहोचले. काँग्रेसच्या उत्पन्नात मात्र घट झाली आहे. काँग्रेसचे उत्पन्न १४ टक्क्यांनी घटले. काँग्रेसचे उत्पन्न २०१५-१६ मध्ये २६१. ५६ कोटी होते. ते आता २२५. ३६ कोटींवर आले आहे.

भाजपाने निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीनुसार २०१६- १७ या वर्षात भाजपाचे ७१०. ५७ कोटी रुपये खर्च झाले. तर काँग्रेसचे ३२१. ६६ कोटी रुपये खर्च झाले. विशेष म्हणजे काँग्रेसचे उत्पन्नापेक्षा खर्चाचे प्रमाण जास्त होते.

राजकीय पक्षांना मिळणाऱ्या एकूण देणग्यांपैकी ७४. ९८ टक्के देणग्या या ऐच्छिक होत्या. तर १२८. ६० कोटी रुपये हे पक्षांना बँकेतील व्याजातून मिळाले आहेत. राजकीय पक्षांनी ३० ऑक्टोबर २०१७ पर्यंत ऑडिट रिपॉर्ट सादर करणे बंधनकारक असते. मात्र, भाजपाने ८ फेब्रुवारी आणि काँग्रेसने १९ मार्च रोजी रिपोर्ट सादर केले. भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सीपीआय हे चारही गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने रिपोर्ट सादर करण्यास विलंब करत असल्याचे एडीआरच्या अहवालात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 10, 2018 6:10 pm

Web Title: association for democratic reforms report 2018 bjp income jumps to rs 1034 crore congress dips 14 percent
Next Stories
1 नरेंद्र मोदी व अमित शाहांचं काँग्रेसचा निषेध करण्यासाठी दिल्लीत उपोषण
2 ‘नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी मला LoUs साठी ब्लॅकमेल करायचे’
3 ‘शांतीसंदेश’च्या माध्यमातून नितीशकुमारांनी मोदींना सांगितली ‘मन की बात’
Just Now!
X