07 August 2020

News Flash

ज्योतिषाची भविष्यवाणी सांगते… स्मृती इराणी राष्ट्रपती होणार!

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका ज्योतिषाकडे आपले भविष्य बघताना दिसून आल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत

| November 24, 2014 01:09 am

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका ज्योतिषाकडे आपले भविष्य बघताना दिसून आल्याने त्या पुन्हा एकदा वादाच्या भोवऱयात सापडल्या आहेत. आश्चर्याचीबाब म्हणजे या ज्योतिषाने स्मृती इराणी एकेदिवशी भारताच्या राष्ट्रपती होतील अशी भविष्यवाणी वर्तविली आहे.
राजस्थानच्या भीलवडा परिसरातील प्रसिद्ध ज्योतिष पंडित नथ्थूलाल व्यास यांच्यासमोर हात दाखवून आपले भविष्य ऐकताना स्मृती इराणींचे छायाचित्र समोर आले आहे. देशातील मुलांचे भविष्य घडविण्याची जबाबदारी असलेल्या स्मृती इराणी ज्योतिषासमोर हात पसरुन स्वत:च्या भविष्याची काळजी करताना कॅमेऱ्यात कैद झाल्याने त्या वादात सापडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, स्मृती इराणी याआधीही ज्योतिष नथ्थूलाल यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना राजकारणात मोठे पद मिळेल, असे भाकित नथ्थूलाल यांनी वर्तविले होते. आता केंद्रात महत्त्वाच्या मंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर स्मृती इराणी यांनी पुन्हा एकदा नथ्थूलाल यांची भेट घेऊन त्या तब्बल चार तास नथ्थूलाल यांच्या घरी ठाण मांडून बसल्या होत्या. सुत्रांच्या माहितीनुसार, या भेटीत नथ्थूलाल यांनी पाटीवर काही संदेश लिहून स्मृती इराणी यांचे आगामी काळातील भविष्य वर्तवल्याचे समजते. मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि शिक्षण क्षेत्राची जबाबदारी असणाऱया अशा महत्त्वाच्या मंत्रीपदी विराजमान असणाऱया नेत्याने स्वत: मात्र आपल्या भविष्यासाठी ज्योतिषाकडे जाऊन हात पसरल्याने जनमतात रोष व्यक्त केला जात आहे.  याआधी देखील स्मृती इराणी आपल्या शैक्षणिक पात्रतेवरून चर्चेचा विषय ठरल्या होत्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 24, 2014 1:09 am

Web Title: astrologer to smriti irani you will become president one day
टॅग Smriti Irani
Next Stories
1 काश्मीर, लडाखमध्ये थंडीची लाट
2 दिल्लीत शासकीय वाहनांच्या खरेदीवर बंदी, नव्या खरेदीसाठी ४.७५ लाखाची मर्यादा
3 मध्यमवर्गीय करदात्यांना ‘अच्छे दिन’?
Just Now!
X