खगोलवैज्ञानिकांनी सात नवीन बटू दीर्घिका शोधून काढल्या असून त्यांनी नवीन प्रकारच्या दुर्बीणीचा वापर त्यासाठी केला आहे. ‘येल’ विद्यापीठाच्या खगोलवैज्ञानिकांनी टेलेफोटो भिंगे एकत्र जोडून नवीन दुर्बीण तयार केली व या सात दीर्घिकांचा शोध लावला आहे. सर्पिलाकार दीर्घिकांचा शोध घेत असताना त्यांना या दीर्घिकांचा शोध लागला आहे. या दीर्घिका आतापर्यंत माहिती नव्हत्या. त्यामुळे ‘कृष्णद्रव्य व दीर्घिकांची उत्क्रांती’ या विषयावर नवीन प्रकाश पडू शकेल. अवकाशात नवीन घटकांचा शोधही लागू शकेल असे संशोधकांचे म्हणणे आहे.
‘येल’ विद्यापीठाच्या खगोलशास्त्र विद्यापीठाचे प्रमुख पीटर व्हॅन डोक्युम यांनी रोबोटिक दुर्बीण तयार केली असून त्यात त्यांना टोरांटो विद्यापीठाचे खगोलवैज्ञानिक रॉबटरे अब्राहम यांनी सहकार्य केले आहे. ड्रॅगनफ्लाय टेलेफोटो अ‍ॅरे यंत्रणेत आठ टेलेफोटो भिंगे विशिष्ट थर देऊन जोडली जातात व नंतर ती आतल्या आत प्रकाशाचे विकिरण करतात. त्यामुळे अतिशय अंधूक प्रकाश असलेले अवकाश घटकही टिपता येतात. त्यामुळेच या कमी प्रकाशमानता असलेल्या या दीर्घिकांचा शोध लागू शकला. व्हॅन डॉक्युम यांनी सांगितले की, वल्र्ड कपमध्ये जी भिंगे वापरली जातात तशा प्रकारची ही भिंगे असून आपण ती वरती रोखू शकतो. ते व अब्राहम यांनी  २०१२ मध्ये न्यू मेक्सिको येथील आकाशात अशी भट्टीच्या आकाराची दुर्बीण रोखली, मेहील नावाच्या भागातील एक वेधशाळाच होती. या दुर्बीणीचे नाव ‘ड्रॅगनफ्लाय’ असे असून तिची भिंगे ही कीटकांच्या डोळ्यातील संयुक्त भिंगासारखी असल्याने तिला ड्रॅगन फ्लाय या कीटकाचे नाव देण्यात आले. मेरिट यांनी सांगितले की, आपल्या विश्वात विखुरलेल्या काही दीर्घिका आहेत. त्यांच्या निर्मितीविषयी या संशोधनातून प्रकाश टाकण्यात येईल. हे केवळ हिमनगाचे शिखर असून अशा हजारो दीर्घिका असाव्यात, पण त्या आपल्याला माहित नाहीत असे त्यांनी सांगितले. त्यांच्यातील काही नवीन प्रकारातील दीर्घिका असतील, त्या एम १०१ भोवती फिरणारे उपग्रह असले तर आपल्याला आश्चर्य वाटेल, असे व्हॅन डॉक्युम यांनी सांगितले; म्हणजे त्या दीर्घिकाच आहेत असे त्यांचे मत आहे.