22 September 2020

News Flash

…म्हणून पंतप्रधान मोदींच्या सुरक्षा कड्यामध्ये १५० करोनामुक्त पोलीस

साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उतरतील त्यावेळी....

अयोध्येमध्ये आज दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते भव्य राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास अयोध्येतील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॉप्टर उतरेल, त्यावेळी त्यांच्याभोवती विशेष सुरक्षाकडे असणार आहे. या सुरक्षा कड्यामध्ये करोनामुक्त झालेले स्थानिक पोलीस असतील, असे राज्याच्या पोलीस उपमहानिरीक्षकांनी मंगळवारी सांगितले.

भूमिपूजन सोहळयाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी तीन तास अयोध्येमध्ये असतील. मोदींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या या पोलिसांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. या पोलिसांमुळे करोनाचा फैलाव होणार नाही, असा प्रशासनाला विश्वास आहे. पुढचे काही महिने करोनाच्या धोक्यापासून पंतप्रधान मोदींचा बचाव करणे आवश्यक आहे.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तंदुरुस्त सुरक्षारक्षकांची नियुक्ती करणे हा प्रोटोकॉलचा भाग आहे. सध्याच्या या दिवसांमध्ये करोना योद्ध्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त कोण असू शकतात? असे यूपीचे पोलीस उपमहानिरीक्षक दीपक कुमार म्हणाले. करोनामुक्त झालेले हे १५० पोलीस सुरक्षेच्या पहिल्या स्तरामध्ये असतील. अयोध्येमध्ये करोनामुळे आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ६०४ जण करोनाबाधित आहेत.

“मी २९ जुलैला राज्याचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांना पत्र लिहिले. करोनाची लागण होऊन त्यातून २५ जुलैपर्यंत बऱ्या झालेल्या १५० पोलिसांना अयोध्येला पाठवण्याची विशेष विनंती केली” असे दीपक कुमार यांनी सांगितले. बहुतांश पोलीस हे लखनऊचे असून काहीजण बरेलीचे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 5, 2020 7:54 am

Web Title: at bhumi pujan 150 cops recovered from covid 19 will be pms security ring dmp 82
Next Stories
1 अयोध्या-बाबरी वादामुळे कशी पेटली मुंबई?
2 लेबनान स्फोट : ७० जण ठार तर ४००० जखमी
3 शापित नायक!
Just Now!
X