News Flash

नायजेरिया : दहशतवाद्यांनी ११० शेतमजुरांची गळा चिरुन केली हत्या; महिलांना पळवून नेलं

अचनाक दहशतवाद्यांच्या टोळीने केला हल्ला

(Photo : Ahmed Kingimi/Reuters)

नायजेरियामधील दहशतवादी संघटना बोको हरमने पुन्हा एकदा मोठं हत्याकांड घडवून आणलं आहे. संयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार बोको हरम या इस्लामिक कट्टरतावादी संघटनेने शेतात काम करणाऱ्या ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. बोको हरमच्या दहशतवाद्यांच्या एका सशस्त्र गटाने केलेल्या या हल्ल्यामध्ये सर्व पुरुषांची गळा चिरुन हत्या करण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांनी काही महिलांना पळवून नेलं.

नायजेरियामधील संयुक्त राष्ट्राचे समन्वयक असलेल्या एडवर्ड कल्लोन यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान ११० लोकांची निर्दयीपणे हत्या केली आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. मुख्य शहर असणाऱ्या मैदूगुरीपासून जवळच असणाऱ्या कोशोबेजवळ हे हत्याकांड घडलं आहे. शेतामध्ये काम करणाऱ्यांवर अचानक दहशतवाद्यांच्या एका टोळीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सुरुवातील ४३ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं होतं. नंतर हा आकडा  ७० पर्यंत पोहचवला आणि त्यानंतर हा आकडा ११० पर्यंत गेला. सर्व सामान्य नागरिकांवर करण्यात आलेला हा हल्ला धक्कादायक असल्याचे संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींना कठोर शिक्षा दिली पाहिजे असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.

अल जझीराने दिलेल्या वृत्तानुसार मजूर शेतात काम करत असताना अचानक सशस्त्र दहशतवादी तेथे आले. त्यांनी मजुरांना बांधलं आणि त्यानंतर गळा चिरुन त्यांनी हत्या केली. नायजेरियाचे राष्ट्रपती मोहम्मदू बुहारी यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला असल्याचे राष्ट्रपतींने म्हटले आहे.

(फोटो सौजन्य : जोसी ओला/एपी फोटो)

यापूर्वीही बोको हरामने अशाप्रकारे हल्ले केले आहेत. हत्या करण्यात आलेले सर्व मजूर हे सोकोटो राज्यातील आहेत. हे मजूर कामाच्या शोधात कोशोबेमध्ये आले होते. या प्रकरणामध्ये आता सरकारी यंत्रणा अधिक तपास करत आहेत. सर्व मृतदेह जाबरमारी गावामध्ये दफन करण्यात आले आहेत. मागील ११ वर्षांमध्ये नायजेरियामध्ये ३६ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० लाखांहून अधिक जण स्थलांतरित झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 30, 2020 12:31 pm

Web Title: at least 110 civilians killed in gruesome nigeria massacre scsg 91
Next Stories
1 श्रीलंकेत जेलमध्ये उसळली दंगल, आठ कैद्यांचा मृत्यू; ३७ जखमी
2 योगी सरकारच्या ‘लव्ह जिहाद’विरोधी अध्यादेशावर मायावतींनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
3 कोणत्याही जातीचा उमेदवार देऊ पण मुस्लीम उमेदवार देणार नाही; भाजपा नेत्याचे वक्तव्य
Just Now!
X