अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील मंत्रालयाबाहेर झालेल्या स्फोटात किमान १२ ठार तर ३१ जण गंभीर जखमी झाले. रमजानसाठी कर्मचारी कार्यालयाबाहेर जाण्याच्या गडबडीत असतानाच हा स्फोट झाला. हा आत्मघातकी स्फोट असल्याचे सांगण्यात येते.

मंत्रालयाच्या बाहेर पडण्याच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्फोट झाल्याचे ग्रामीण पुनर्वसन आणि विकास मंत्रालयाचे प्रवक्ते दाऊद नैमी यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले. अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. महिला, मुलं आणि कर्मचारी या स्फोटाचे बळी ठरल्याची माहिती अंतर्गत मंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली.

haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
high court ask Questions to bmc and sent notice over Tragic Deaths of children in Wadala
दोन मुलांच्या मृत्यूचे प्रकरण: मुंबईत मानवी जिवाची किंमत काय? उच्च न्यायालयाचा महापालिकेला प्रश्न
ससूनमध्ये नेमकं काय घडलं? उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू नव्हे तर दुसरेच कारण

तालिबानी दहशतवाद्यांनी शनिवारी एक आश्चर्याचा धक्का देणारी घोषणा केली होती. या आठवड्या अखेरीस ईदची सुटी असल्यामुळे तीन दिवसांची शस्त्रसंधी जाहीर केली होती. त्यानंतर सरकारनेही त्वरीत तालिबानविरोधात शस्त्रसंधीची घोषणा केली होती.