News Flash

लिबियात अर्ध्या तासाच्या अंतरात दोन बॉम्बस्फोट, २७ ठार तर ३० जण जखमी

अर्ध्या तासांच्या अंतराने एकाच ठिकाणी हे स्फोट झाले.

अर्ध्या तासांच्या अंतराने एकाच ठिकाणी हे स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. (REUTERS PIC)

लिबियाच्या पूर्व भागात असलेल्या बेन्गाझी शहरात झालेल्या दुहेरी कार बॉम्बस्फोटात किमान २७ लोक ठार तर ३० जण जखमी झाले. अर्ध्या तासांच्या अंतराने एकाच ठिकाणी हे स्फोट झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पहिला स्फोट झाल्यानंतर सुरक्षा दल आणि सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते बचाव कार्यात असतानाच दुसरा स्फोट झाला. सलमानी भागात पहिला स्फोट मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजून २० मिनिटांनी झाला तर दुसरा स्फोट हा अर्ध्या तासांनी झाला, असे सैन्य व पोलीस दलाचे प्रवक्ते कॅप्टन तारेक अल्खराज यांनी सांगितले. यावेळी सुरक्षा कर्मचारी, वैद्यकीय पथक आणि स्थानिक लोक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते.

या स्फोटात किमान २७ लोक ठार तर ३२ जण गंभीर जखमी असल्याचे स्थानिक आरोग्य अधिकारी हानी बेलरास अली यांनी सांगितले. या हल्ल्याची अद्याप कोणी जबाबदारी घेतलेली नाही. संयुक्त राष्ट्रानेही सोशल मीडियावर या हल्ल्याची निंदा केली आहे. तर अफगाणिस्तानमधील पूर्व भागातील सेव्ह द चिल्ड्रेन्स कार्यालयावरही बुधवारी बंदूकधाऱ्यांनी हल्ला केला. यात किमान ११ जण ठार झाल्याचे सांगण्यात येते.

जलालाबाद शहरातील ब्रिटिश स्वंयसेवी संस्थेच्या बाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये स्फोट केल्यानंतर हल्लेखोरांनी परिसरात ग्रेनेडने हल्ला केला होता. इमारतीत लपून बसलेल्या कर्मचाऱ्याने व्हॉट्सअपवर संदेश पाठवत, आपण दोन हल्लेखोरांचा आवाज ऐकल्याचे सांगत ते आपला शोध घेत आहेत. आमच्यासाठी प्रार्थना करता आणि सुरक्षा दलांना सूचना द्या, असे त्याने आपल्या संदेशात म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2018 3:54 pm

Web Title: at least 27 people killed in car bomb blasts in libya benghazi city
Next Stories
1 अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानातील हक्कानी नेटवर्कच्या कमांडरचा खात्मा
2 लालूंना अडकवण्यासाठीच भाजप-नितीश कुमारांचा कट: तेजस्वी यादव
3 भारत- पाकिस्तान वादावर बंकर हा काही तोडगा नव्हे; मेहबुबा मुफ्ती
Just Now!
X