04 March 2021

News Flash

केनियात मॉलमधील हल्ल्यात ५९ ठार

केनियाच्या राजधानीतील एका मॉलमध्ये काही अज्ञात हल्लेखोर शिरून त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तसेच ग्रेनेड

| September 22, 2013 02:36 am

केनियाच्या राजधानीतील एका मॉलमध्ये काही अज्ञात हल्लेखोर शिरून त्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात तसेच ग्रेनेड हल्ल्यामध्ये किमान ५९ जण ठार झाले, असून हा आकडा वाढण्याची भीती आहे. दरम्यान,  या हल्ल्याची जबाबदारी सोमालियातल्या अल शहाब या दहशतवादी संघटनेने घेतली आहे.
शनिवारी दुपारी ही घटना घडली. उशिरापर्यंत मॉलमधील हल्लेखोरांचा गोळीबार सुरूच होता, तसेच अनेक जण आतमध्ये अडकून पडले होते, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. लष्कराने सदर मॉलभोवती वेढा घातला असून आत अडकलेल्या लोकांची सुटका करण्यास प्राधान्य दिले जात आहे. हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र हल्लेखोरांकडून मुस्लिमेतरांनाच लक्ष्य केले जात असल्याची माहिती रेड क्रॉस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच काही पोलिसांनी दिली.
अंदाज होता?
नैरोबीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या वेस्टगेट मॉलची मालकी इस्राईली नागरिकांची असून काही दिवसांपूर्वी संरक्षण दलाच्या अधिकाऱ्यांनी सदर मॉलवर हल्ला होऊ शकतो असे स्पष्ट केले होते. सोमालियातील मुस्लिमविरोधी कारवायांना केनियाने पाठिंबा दिल्याने त्यांच्याकडून या हल्ल्याची सर्वाधिक शक्यता वर्तवली जात आहे.
हल्लेखोरांमध्ये महिलांचाही समावेश?
सरजट मेजर फ्रँक मुगुंगू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांमध्ये किमान चार पुरुष व एक महिला यांचा समावेश होता. त्यातील एकाचा चेहरा पाहता तो नक्कीच सोमालियन असावा. प्रत्यक्षदर्शी जय पटेल याने हल्लेखोरांकडे एके-४७ सारखी आधुनिक शस्त्रे असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2013 2:36 am

Web Title: at least 30 killed in nairobi mall gun attack
Next Stories
1 आणखी दोन आमदारांना अटक
2 माझ्यावरील आरोप खोडसाळपणाचे
3 छोटी शहरे जोडण्यासाठी १०० विमानतळे उभारणार
Just Now!
X